NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL Auction : मुंबईने ग्रीनला केलं करोडपती, गर्लफ्रेंड पाहून वाटेल अमिताभ-जयाची जोडी

IPL Auction : मुंबईने ग्रीनला केलं करोडपती, गर्लफ्रेंड पाहून वाटेल अमिताभ-जयाची जोडी

IPL 2023 Auction: आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनमध्ये पहिल्यांदाच सामील झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमरून ग्रीन याच्यावर पैशांचा पाऊस पडला. मुंबई इंडियन्सने ग्रीनला 17.50 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. मुंबईच्या टीमची आयपीएल इतिहासातली ही सर्वाधिक बोली आहे. कॅमरून ग्रीनच्या गर्लफ्रेंडचे फोटो बघितल्यानंतर तुम्हाला अमिताभ-जया बच्चन यांच्या जोडीची आठवण येईल.

18

आयपीएल 2023 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर कॅमरून ग्रीनला 17.50 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. मुंबईच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी बोली आहे. ग्रीनआधी सॅम करनवर आयपीएल इतिहासातली सर्वाधिक बोली लागली. करनला 18.50 कोटी रुपयांना पंजाबने विकत घेतलं. याचसह करनने क्रिस मॉरिसला पिछाडीवर टाकलं. राजस्थानने 2021 च्या लिलावात मॉरिससाठी 16.25 कोटी रुपये मोजले होते. आयपीएल लिलावात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या कॅमरून ग्रीन आणि त्याची गर्लफ्रेंड एमिली रेडवूडचे फोटो पाहून बॉलिवुडची सुपर हिट जोडी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची आठवण येते. (Emily Redwood/Instagram)

28

23 वर्षांच्या कॅमरून ग्रीनने काही महिन्यांआधी भारत दौऱ्यावर असताना आक्रमक खेळी केली होती. या इनिंगनंतरच त्याच्यावर आयपीएल फ्रॅन्चायजींचं लक्ष होतं. पहिल्यांदा लिलावात सहभागी झालेल्या कॅमरून ग्रीनची बेस प्राईज 2 कोटी रुपये होती. या बेस प्राईजपेक्षा ग्रीनला कित्येक पट जास्त पैसे मिळाले. आयपीएल लिलावावेळी कॅमरून ग्रीनच्या गर्लफ्रेंडची चर्चाही सोशल मीडियावर सुरू आहे. (Emily Redwood/Instagram)

38

कॅमरून ग्रीनची गर्लफ्रेंड एमिली रेडवूड डायटिशियन आणि न्यूट्रीशियन आहे. एमिली खूपच फिट आहे आणि तिला फिरण्याची हौस आहे. कॅमरून आणि एमिली इन्स्टाग्रामवर त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो शेअर करत असतात. (Cameron Green/Instagram)

48

एमिली रेडवूडने कर्टिन युनिव्हर्सिटीमधून न्यूट्रीशियन मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ती सध्या मास्टर्स इन डाईट करत आहे. 2021 साली एमिली NADSA Curtin (Nutrition and Dietetics Student Association) ची अध्यक्षही होती.

58

कॅमरून ग्रीनची गर्लफ्रेंड एमिली ग्लूटन फ्री डाएट फॉलो करते, पण ही तिची इच्छा नाही. 2016 साली एमिलीला सीलिएक नावाचा आजार झाला होता. सीलिएक असणाऱ्या व्यक्तीला ग्लुटनच्या संपर्कात आल्यानंतर आतड्यांना सूज येते, म्हणून ती ग्लुटन फ्री फूड खाते. या आजाराबाबत कळल्यानंतर एमिली न्यूट्रीशियन आणि आरोग्याबाबत जास्त जागरुक झाली. (Emily Redwood/Instagram)

68

कॅमरून आणि एमिली नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करतात. हे फोटो पाहून तुम्हाला अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी आठवेल, कारण कॅमरून आणि एमिली यांची उंची. (Emily Redwood, Amitabh Bachchan/Instagram)

78

कॅमरून आणि एमिली यांच्या उंचीतला फरक त्यांच्या फोटोंमध्ये दिसून येतो. 6 फूट 4 इंच लांब असलेल्या कॅमरूनची गर्लफ्रेंड त्याच्या खांद्याला लागते. एमिलीने फेब्रुवारी 2022 मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केलं. कॅमरून ग्रीन एमिलीच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीमध्येही गेला होता. याचे फोटो त्याने शेअर केले होते. (Cameron Green/Instagram)

88

कॅमरून ग्रीनने 7 जून 2021 ला एमिलीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यामुळे या दोघांच्या रिलेशनशीपला 2 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. कॅमरून ग्रीनने आतापर्यंत 8 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांच्या मदतीने 139 रन केले. तसंच त्याने 5 विकेटही घेतल्या आहेत. (Emily Redwood/Instagram)

  • FIRST PUBLISHED :