NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2022 : या 5 खेळाडूंमुळे बुडलं मुंबईचं जहाज, प्ले-ऑफमध्ये पोहोचणंही झालं अशक्य

IPL 2022 : या 5 खेळाडूंमुळे बुडलं मुंबईचं जहाज, प्ले-ऑफमध्ये पोहोचणंही झालं अशक्य

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. मुंबईचे पाच खेळाडू त्यांंच्या या खराब कामगिरीचं कारण ठरलं आहे.

16

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. मोसमातल्या पहिल्या 6 सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे, त्यामुळे पाचवेळची चॅम्पियन असलेल्या या टीमचं प्ले ऑफमध्ये पोहोचणंही अशक्य झालं आङे. मुंबई इंडियन्ससाठी काही स्टार खेळाडूच व्हिलन ठरले, त्यांच्या कामगिरीमुळेच मुंबईची अशी अवस्था झाली.

26

मुंबई इंडियन्सची यावेळी सर्वाधिक निराशा झाली ती कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फॉर्ममुळे. नेतृत्वासोबतच रोहित बॅटिंगमध्येही अपयशी ठरला. 6 मॅचमध्ये त्याला फक्त 114 रनच करता आले आहेत.

36

रोहित शर्मासोबत ओपनिंगला खेळणाऱ्या इशान किशनने (Ishan Kishan) पहिल्या दोन मॅचमध्ये अर्धशतकं केली, पण यानंतर त्याची गाडी ट्रॅकवरून उतरली. 6 मॅचमध्ये इशान किशनने 191 रन केले आहेत. आयपीएल लिलावात सगळ्यात महागडा खेळाडू ठरलेल्या इशानला त्याच्या रकमेला साजेशी खेळी करता आलेली नाही.

46

मुंबईच्या पराभवाचा सगळ्यात मोठा व्हिलन ठरला तो डावखुरा फास्ट बॉलर टायमल मिल्स (Tymall Mills). मिल्सला जोफ्रा आर्चरच्या गैरहजेरीत बुमराहची साथ द्यायची होती, पण यात तो पूर्णपणे अपयशी ठरला. मिल्सने या मोसमात खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये 6 विकेट घेतल्या आहेत.

56

गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईची ताकद असलेला कायरन पोलार्डही (Kieron Pollard) या मोसमात फ्लॉप ठरला. पोलार्डने 6 मॅचमध्ये फक्त 82 रन केले आहे, तसंच त्याला एक विकेट घेण्यात यश आलं.

66

मुंबईचा हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) या मोसमातल्या 6 मॅचपैकी 4 मॅचमध्ये एकही विकेट मिळाली नाही. उरलेल्या दोन मॅचमध्ये त्याने 4 विकेट घेतल्या आहेत.

  • FIRST PUBLISHED :