NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / एकदाही जिंकले नाही IPL! पण 12 वर्षात ‘या’ विक्रमावर फक्त RCBचा दबदबा

एकदाही जिंकले नाही IPL! पण 12 वर्षात ‘या’ विक्रमावर फक्त RCBचा दबदबा

RCBच्या चाहत्यांसाठी अभिमानाची बाब! या विक्रमात मुंबईचा संघ नाही आसपास.

18

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यावेळी आयपीएलचा हंगाम 29 मार्च ते 24 मे पर्यंत खेळला जाणार आहे. यावेळी एकूण 56 सामने होणार आहेत. गेल्या 12 वर्षांप्रमाणेच यावेळी चाहत्यांना आयपीएलचा थरार पाहायला मिळेल.

28

आयपीएलच्या आतापर्यंतच्या 12 हंगामात अनेक फलंदाजांनी शानदार कामगिरी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मात्र यातील एका विक्रमात सर्वात पुढे आहेत ते विराट कोहलीचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे खेळाडू.

38

आयपीएलच्या 12 हंगामात आतापर्यंत एकूण 54 शतक लगावले आहेत. यात सर्वात जास्त शतक लगावण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या नावावर आहे.

48

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगळुरू संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएल जिंकता आलेले नाही. गेल्या वर्षी विराटचा संघ गुणतालिकेत सर्वात तळाचा संघ होता.

58

मात्र गेल्या 12 हंगामात विराटच्या बंगळुरू संघाने सर्वात जास्त शतक लगावले आहेत. आरसीबीने आतापर्यंत 13 शतक लगावले आहेत. मात्र बंगळुरू संघाला आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. मात्र शतक लगावण्यात RCBचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे.

68

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आहे. पंजाब संघाने आतापर्यंत 11 शतक लगावले आहेत. तर दिल्ली आणि चेन्नई संघानं 8-8 शतक लगावले आहेत.

78

मात्र या यादीमध्ये चारवेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघाला आतापर्यंत केवळ 4 वेळा शतक लगावता आले आहे. तर कोलाकाता नाईट रायडर्सकडून मॅक्युलमने एकमेव शतक लगावले आहे.

88

आरसीबीचा तेराव्या हंगामातील पहिला सामना 31 मार्च रोजी कोलाकाता विरुद्ध होणार आहे. यावेळी विराट विजेतेपद पटकावण्यासाठी मैदानात उतरेल.

  • FIRST PUBLISHED :