NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / पगारातही मुंबईचं अव्वल! रोहितपासून बुमराहपर्यंत मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना मिळते इतकी सॅलरी

पगारातही मुंबईचं अव्वल! रोहितपासून बुमराहपर्यंत मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना मिळते इतकी सॅलरी

आयपीएलच्या विजेत्या संघापेक्षा जास्त कमवतात मुंबई इंडियन्सचे खेळाडू. पाहा एका सामन्यात किती कमवतात.

110

आयपीएलच्या तेराव्या हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

210

चारवेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघ यावेळी पाचव्यांदा चॅम्पियन होण्यास सज्ज आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्माला या पाच फलंदाजांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

310

यंदाच्या आयपीएलमध्ये संघाना मिळणारी रक्कम कमी करण्यात आली असली तरी, खेळाडूंना याचा तोटा होणार नाही आहे. मुंबई इंडियन्सचे खेळाडू इतर संघातील खेळाडूंपेक्षा जास्त कमवतात. मुंबई संघात सर्वात जास्त पगार तो कर्णधार रोहित शर्माचा.

410

रोहित शर्माला आयपीएल 2018च्या लिलावात तब्बल 15 कोटींना रिटेन केले होते. धोनी आणि विराटनंतर आयपीएलमध्ये सगळ्यात जास्त पगार रोहित शर्माचा आहे. 2011पासून रोहित मुंबई संघात आहे.

510

रोहितनंतर सर्वात जास्त पगार आहे हार्दिक पांड्याचा. हार्दिकला 2015च्या लिलावात मुंबई संघाने 10 लाखांना विकत घेतले होते. तर, 2018मध्ये त्याला रिटेन करण्यासाठी तब्बल 11 कोटींची किंमत मोजली.

610

भारताचा हुकुमी एक्का असलेला जसप्रीत बुमराह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पांड्याप्रमाणेच बुमराहलाही 2015मध्ये कमी किमतीत विकत घेतले होते. मात्र 2018मध्ये त्याला रिटेन करण्यासाठी तब्बल 7 कोटी मुंबईने मोजले.

710

हार्दिक पांड्याप्रमाणे आणखी एक नाव मुंबईकरांच्या तोंडावर असते, ते म्हणजे कृणाल पांड्या. कृणालला सर्वात आधी मुंबईने 2 कोटींना घेतले होते. मात्र 2018मध्ये मॅच कार्डने त्याला 8.8 कोटींना संघात रिटेन केले.

810

मुंबई इंडियन्स संघाचा मॅच विनर खेळाडू किरेन पोलार्डही रोहितप्रमाणे पहिल्यापासून मुंबईचा हिस्सा आहे. 2018मध्ये पोलार्डला रिटेन करण्यासाठी मुंबईने 5.4 कोटी मोजले होते.

910

यॉर्कर किंग लसिथ मलिंगाही सर्वात जास्त पगार असलेला खेळाडू आहे. 2009पासून मलिंगा मुंबई संघात आहे. 2018मध्ये मलिंगाला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात घेतले. त्यानंतर 2019च्या लिलावात मलिंगावर 2 कोटींची बोली लागली होती.

1010

2020च्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने 2 महत्त्वाच्या खेळाडूंना संघात घेतले. ख्रिस लीनला मुंबईने 2 कोटींना लिलावात विकत घेतले तर, ट्रेंट बोल्टला या लिलावात 2.2 कोटींना विकत घेतले.

  • FIRST PUBLISHED :