NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / दोन धावा का घेता आल्या नाही? शार्दुलने केला चेन्नईच्या पराभवाचा खुलासा

दोन धावा का घेता आल्या नाही? शार्दुलने केला चेन्नईच्या पराभवाचा खुलासा

शार्दुल ठाकुरला शेवटच्या चेंडूवर बाद करून मुंबईने एका धावेनं विजय मिळवून चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं.

  • -MIN READ

    Last Updated: May 16, 2019, 08:23 IST
112

आयपीएलच्या 12 व्या हंगामात मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर एका धावेनं चेन्नई एक्सप्रेसवर विजय मिळवला. लसिथ मलिंगाने 20 व्या षटकात अखेरच्या चेंडूवर शार्दुल ठाकुरला बाद करुन चेन्नईचं विजेता होण्याचं स्वप्न उधळून लावलं. हिरो ठरण्याची संधी गमावलेल्या शार्दुल ठाकुरने या आठवणी एका मुलाखतीत सांगितल्या.

212

शार्दुल ठाकुरने म्हटले की, मी मैदानावर असताना डोक्यात फक्त विजयाबद्दल विचार सुरु होता. मोठं मैदान असल्याने दोन धावा घेण्याची संधी होती. तर मलिंगा राउंड द विकेट गोलंदाजी करत होता. जर त्याने यार्कर टाकला नसता तर मी स्क्वेअर लेगवरून मारण्याचा विचार केला होता.

312

रविंद्र जडेजाने त्यावेळी हवेत फटका न मारण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मोठा फटका न खेळता ज्या बाजूला मोठे मैदान आहे तिकडे शॉट खेळणार होतो असेही शार्दुल ठाकुरे सांगितले. मला शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळायला हवा होता. मात्र, दबावाच्या परिस्थितीत जे झालं त्याने आम्हाला पराभव पत्करावा लागला असं शार्दुल ठाकुर म्हणाला.

412

फायनलमध्ये शेन वॉटसन बाद झाल्यानंतर चेन्नईने हरभजन सिंग आणि दीपक चाहर यांच्याऐवजी शार्दुल ठाकुरला फलंदाजीला मैदानात पाठवलं होतं. त्याबद्दल सांगताना शार्दुल म्हणाला की, डगआऊटमध्ये सर्वांनाच फलंदाजीसाठी तयार राहण्यात सांगितलं होतं. जेव्हा वॉटसन बाद झाला तेव्हा मला पाठवण्यात आलं. या निर्णयाबद्दल मी कोणाला काही विचारलं नाही आणि कोणी मला काही सांगितलं नाही असंही शार्दुलने मुलाखतीवेळी सांगितले.

512

पराभवानंतर ड्रेसिंगरूममध्ये शांतता पसरली होती. मला स्वत:लासुद्धा काही समजत नव्हतं. मात्र, कोणीही ओव्हर रिअॅक्ट झालं नाही असं शार्दुल म्हणाला. वाचा... IPL 2019: गुडघ्यातून रक्तस्राव सुरू असतानाही तो धोनीसाठी मैदानात लढत होता...

612

IPL 2019च्या अंतिम लढतीत मुंबईने चेन्नईचा पराभव करत विक्रमी चौथ्यांदा विजेतेपद मिळवले. मुंबईच्या या विजयानंतर त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष सुरू केला तर दुसऱ्या बाजूला चेन्नईच्या पराभवाची देखील तितकीच चर्चा होती. अंतिम सामन्यात चेन्नईकडून शेन वॉटसन वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. वॉटसन या खेळीचे सर्वच जण कौतुक करत आहेत. पण वॉटसन या खेळीचे केवळ भारतात नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्ये कौतुक होत आहे आणि त्याच्या जिद्दीला संपूर्ण क्रिकेट विश्व सलाम करत आहे.

712

चेन्नई सुपर किंग्जने फायनल मॅच हारल्यानंतर संघातील खेळाडू हरभजन सिंग याने वॉटसन संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. वॉटसनच्या गुडघ्याला दुखात झाली होती. इतक नव्हे तर जेव्हा वॉटसन चेन्नईच्या विजयासाठी झटत होता. तेव्हा त्याच्या गुढघ्यातून रक्त येत होते. पण त्याने संघातील कोणालाच ही गोष्ट सांगितली नाही आणि तो फलंदाजी करत होता. संघाला विजयाच्या जवळ पोहोचवल्यानंतर तो जेव्हा धावबाद होऊन परतला तेव्हा टीममधील सर्वांना त्याच्या दुखापतीबद्दल समजले.

812

IPLच्या वेबसाईटवर अंतिम सामन्याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. फोटोत स्पष्टपणे दिसत आहे की शेट वॉटसनच्या डाव्या गुडघ्यातून रक्त येत आहे. रक्त येण्याचे प्रमाण एवढे जास्त होते की एक मोठा रक्ताचा डाग दिसत आहे.

912

सामना झाल्यानंतर संघाच्या विजयासाठी जिरबाज खेळी करणाऱ्या वॉटसनच्या गुडघ्यावर 6 टाके घातले गेले.

1012

मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात वॉटसनने 59 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 80 धावांची खेळी केली. वॉटसनने चेन्नईला जवळ जवळ चौथ्ये विजेतेपद मिळवून दिले होते. पण 20व्या षटकातील चौथ्या चेंडूवर तो धावबाद झाला. दोन रन घेण्याच्या प्रयत्नात तो पळाला पण क्रीझपर्यंत पोहचला नाही.

1112

यंदाच्या आयपीएलमध्ये शेन वॉटसनने 17 सामन्यात 398 धावा केल्या. यात ३ अर्धशतकांचा देखील समावेश आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीवरुद्ध त्याने अर्धशतक केले होते. अंतिम सामन्यात देखील त्याने हीच तशीच कामगिरी केली पण गुडघ्याच्या दुखापतीमुळे विजेतेपद मिळून देऊ शकला नाही.

1212

वरील फोटो चेन्नईची फलंदाजी सुरू होण्याच्या आधीची आहे. यात फाफ डू प्लेसी आणि शेन वॉटसन ही चेन्नईची सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसत आहे. या फोटोत वॉटसनचा गुडघा ठिक असल्याचे दिसते. पण ज्या पद्धतीने त्याने दुखापत झाल्यानंतरही संघाच्या विजयासाठी मोठ्या हिम्मतीने खेल केला त्यासाठी त्याचे केवळ कौतुकच नव्हे तर सलाम देखील केला पाहिजे.

  • FIRST PUBLISHED :