NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL मधल्या खेळाडूंकडे आहेत या आलिशान गाड्या, पाहा तुमच्या आवडत्या क्रिकेटरची गाडी कोणती?

IPL मधल्या खेळाडूंकडे आहेत या आलिशान गाड्या, पाहा तुमच्या आवडत्या क्रिकेटरची गाडी कोणती?

टाटा आयपीएल 2023 स्पर्धा आता हळूहळू रंगात येऊ लागलीय. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचं क्रिकेट चाहत्यांना नेहमीच आकर्षण असतं. अनेक जण या खेळाडूंचं राहणीमान कसं असेल, त्यांचं घर कसं असेल, ते कोणती गाडी वापरत असतील, आदींबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. काही क्रिकेटर्सच्या आलिशान गाड्यांबाबत माहिती घेऊ या. ‘कार अँड बाइक डॉट कॉम’ने याबाबतचं वृत्त दिलंय.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
    Last Updated: April 08, 2023, 22:02 IST
18

हार्दिक पंड्याकडे लॅम्बॉर्घिनी : गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या मुंबईच्या रस्त्यावर विविध आलिशान गाड्या चालवताना अनेक वेळा दिसलाय. पांड्याकडे लॅम्बॉर्घिनी हुराकन ईव्हीओदेखील आहे. या गाडीला 5.2 लिटर एस्पिरेटेड V10 इंजिन असून, ते गाडीच्या केबिनच्या मागच्या बाजूला आहे. ही गाडी 630 bhp आणि 640 Nm टॉर्क देते. 1422 किलोग्रॅमच्या कर्ब वेटवर असणारी ही गाडी 0-100 किमी प्रतितास स्प्रिंट अवघ्या 2.9 सेकंदांत पूर्ण करते.

28

श्रेयस अय्यरकडे आलिशान मर्सिडीज : कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यरकडे आलिशान मर्सिडीज एएमजी G 63 असून, तिची किंमत 2.45 कोटी रुपये आहे. ही गाडी कंपनीच्या जी वॅगन सीरिजमधली आहे. गाडीमध्ये एएमजी 4.0 लिटर V8 टर्बो इंजिन असून, त्याचं आउटपुट 430 kW (577 bhp) आहे. तसंच 850 Nmचं पीक टॉर्क आहे. गाडीच्या स्पीडबद्दल बोलायचं झालं, तर ही गाडी फक्त 4.5 सेकंदांत ताशी 0 ते 100 किमी वेग घेते.

38

मोहम्मद शमीची जग्वार : गुजरात टायटन्सचा पेस बॉलर मोहम्मद शमीकडे जग्वार एफ-टाइप स्पोर्ट्स कार आहे. शमीकडची ही दोन आसनी कूप ‘कॅल्डेरा रेड’ नावाच्या आकर्षक रंगात असून, तिची एक्स शोरूम किंमत 98.13 लाख रुपये आहे. टू सीटर एफ टाइप आर डायनॅमिक 2.0 हा जग्वारच्या स्पोर्ट्सकार लाइन अपमधला एक चांगला प्रकार आहे.

48

2 लिटर 4 सिलिंडर सुपरचार्ज केलेलं पेट्रोल इंजिन 295 bhp पीक पॉवर आणि 400 Nm पीक टॉर्क देतं. 8 स्पीड ZF टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स कारच्या मागच्या चाकांना टॉर्क पाठवतो. एफ टाइप 2.0 250 kmph चा टॉप स्पीड असून, ही गाडी 0-100 kmph स्प्रिंट फक्त 5.7 सेकंदात देते.

58

विराट कोहली : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कॅप्टन विराट कोहलीने त्याच्याकडच्या बहुतांश गाड्या विकल्याची माहिती दिली. कोहली म्हणाला, ‘माझ्या मालकीच्या अनेक कार्स मी विकल्या आहेत व जे व्यावहारिक आहे.’ कोहली सध्या ऑडी या ब्रँडचा ब्रँड अँबेसेडरदेखील आहे. ऑडी मॉडेल्सच्या अ‍ॅरे व्यतिरिक्त कोहलीकडे 2.72 कोटी रुपयांची ऑडी R8 V10 प्लस आहे. ही गाडी 5.2 V10 प्लस प्रकारातली असून, ती 8250 rpm वर 602 bhp आणि 6500 rpm वर 560 Nm जास्तीत जास्त पॉवर आणि कमाल टॉर्क देणाऱ्या इंजिनसह येते.

68

रोहित शर्मा : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माकडे लॅम्बॉर्घिनी उरूस गाडी आहे. त्याच्या गाडीची नंबर प्लेटसुद्धा खास आहे. वन डे क्रिकेटमध्ये रोहितने 264 रन्सची खेळी केली होती. त्यामुळे त्याने त्याच्या गाडीचा नंबर 264 असा घेतलाय. ही गाडी 4.0 लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V8 पेट्रोल इंजिनसह, 641 bhp च्या कमाल पॉवर आउटपुटसह 850 Nm चं पीक टॉर्क देते. हे इंजिन 8 स्पीड ZF ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेलं आहे. लॅम्बॉर्घिनी उरूसच्या किमती भारतात 3.55 कोटी रुपयांपासून सुरू होतात.

78

Hummer- 1992 ते 2009 दरम्यान Hummer चे तीन जनरेशन H1, H2 आणि H3 आले. तर धोनीकडे Hummer H2 आहे. या गाडीत दमदार 6.2-लीटर V8 पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 393 Bhp इतकी पॉवर देते. भारतातहमर H2 ची एक्स शोरूम किंमत 75 लाख रुपये आणि H3 ची किंमत 80 लाख इतकी आहे.

88

Audi Q7- Audi Q7 ही भारतात सर्वात लोकप्रिय लक्झरी आलिशान एसयुव्ही कार आहे. या गाडीमध्ये V12 टर्बो-डिझेल इंजिन दिले आहे.

  • FIRST PUBLISHED :