NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा चढणार बोहोल्यावर; राजस्थानमध्ये करणार शाही विवाह

हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा चढणार बोहोल्यावर; राजस्थानमध्ये करणार शाही विवाह

भारतीय क्रिकेटविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच भारताचा स्टार खेळाडू के एल राहुल अभिनेत्री अथिया शेट्टी सोबत लग्नबंधनात अडकला. तर अक्षर पटेल याने देखील गुजरातमध्ये मेहा सोबत विवाह केला. अशातच आता हार्दिक पांड्याला देखील लग्नाचे वेध लागले आहेत.

16

हार्दिक पांड्या कोणा दुसऱ्या सोबत नाही तर त्याचीच पत्नी नताशा स्टॅंकोव्हिक सोबत दुसऱ्यांदा विवाह करणार आहे. तीन वर्षांपूर्वी हार्दिक पांड्या याने त्याची गर्लफ्रेंड नताशा सोबत कोर्ट मॅरेज केले. नताशा आणि हार्दिकच लग्न होण्यापूर्वीच नताशा गरोदर होती. त्यानंतर तिने अगस्त्य या गोंडस मुलाला जन्म दिला.

26

हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा हे अनेकांसाठी कपल गोल्स आहेत. परंतु नताशाच्या गरोदरपणामुळे या दोघांचे शाही विवाह करण्याचे स्वप्न अधुरे राहिले होते. परंतु यंदा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी हे दोघे विवाह करणार असल्याची माहिती मिळत आहे.

36

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहिती नुसार हार्दिक आणि नताशा राजस्थानमधील उदयपूर येथील एका भव्य पॅलेसमध्ये लग्न करणार आहेत.

46

व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारीला ते ख्रिश्चन पद्धतीने प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न करणार आहेत. हार्दिकच्या जवळच्या मित्राने ही माहिती दिली आहे.

56

विवाह सोहळा 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 16 फेब्रुवारी पर्यंत सर्व विधी असतील.

66

हार्दिक आणि नताशा हे ख्रिश्चन आणि भारतीय रीतीरिवाजांनुसार दोन्ही पद्धतीने लग्न करणार आहेत. लग्नात हळदी, मेहंदी आणि संगीत मोठ्या उत्साहात आयोजित केले जातील.

  • FIRST PUBLISHED :