हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा हे दोघे गुरुवारी हिंदू पद्धतीने विवाह बंधनात अडकले.
यापूर्वी हार्दिक पांड्याने नताशा सोबत व्हॅलेंटाईने डे च्या दिवशी ख्रिस्तचन पद्धतीने विवाह केला होता.
उदयपूर येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये या दोघांचा विवाह पारपडला
हार्दिक आणि नताशाने याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
नताशा आणि हार्दिक च्या या लग्नात त्याचे जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते.
नताशाचे हिंदू पद्धतीने केलेल्या विवाह सोहोळ्यात दोन लूक पाहण्यास मिळाले. यात नताशाने लाल साडी आणि लेहेंगा देखील परिधान केला होता.
तर हार्दिक पांड्याने ऑफ व्हाईट रंगाचा नक्षीदार कुर्ता परिधान केला होता
हार्दिक पंड्या ने नताशा सोबत 31 मे 2020 रोजी विवाह केला होता. परंतु त्यावेळी नताशा ही लग्नापूर्वीच प्रेग्नेंट असल्याने हा विवाह कोर्ट मॅरेज पद्धतीने पारपडला. तेव्हा शाही पद्धतीने लग्न करण्याची इच्छा अधुरी राहिल्याने हार्दिक आणि नताशाने पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला.