टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) भारताला अनेक सामने एकहाती जिंकून दिले असले तरी, त्याला योग्य संधी मिळाल्या नाहीत.
आतंरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच कार्तिकला वैयक्तिक आयुष्यातही खूप त्रास सहन करावा लागला.
अखेर 2013मध्ये टीम इंडियाची स्क्वाश प्लेअर दीपिका पल्लीकल (Dipika Pallikal) कार्तिकच्या आयुष्यात आली. दोन वर्ष डेट केल्यानंतर 2015मध्ये त्यांनी विवाह केला.
तसे, दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांची प्रेमकथा खूपच मजेशीर आहे आहे. एका मुलाखती दरम्यान दीपिकाने दिनेश कार्तिक आणि तिच्यात एक किस्सा शेअर केला होता.
दीपिकाने सांगितले की, एक दिवस दिनेश कार्तिकने तिला डिनरसाठी मेसेज केला होता, ज्यावर तिने काही उत्तर दिले नाही. दिनेशने यानंतर दीपिकाला बर्या च वेळा डेटवर जाण्यासाठी विचारले. मात्र दीपिका नेहमी त्याला काहीतर कारण द्यायची.
मग एक दिवस दीपिकाने असं काही केलं की, त्या गोष्टीची तिलाच लाज वाटली. कारण कार्तिकने तिला रंगेहात पकडलं.
घडलं असं की, एके दिवशी जेव्हा कार्तिकने दीपिकाला पुन्हा डिनरला जायचे का विचारले दीपिकाने खोटे सांगितले की ती ऑस्ट्रेलियाला जात आहे.
दुसर्यांच दिवशी जेव्हा दीपिका जिममध्ये गेली तेव्हा दिनेशनं तिला पाहिलं.
दिनेशला जिममध्ये पाहून दीपिकाला वाईट वाटलं आणि तिने दिनेशसोबत डिनरला जाण्याचे मान्य केले.
यानंतर दोघांनी 2 वर्ष एकमेकांना डेट केलं, त्यानंतर 2015मध्ये त्यांनी लग्न केलं.