NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IND vs ENG : इंग्लंडमध्ये असलेला रोहित शर्मा बनला कॉमेंटेटर, म्हणाला...

IND vs ENG : इंग्लंडमध्ये असलेला रोहित शर्मा बनला कॉमेंटेटर, म्हणाला...

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. भारताचा ओपनर रोहित शर्माने (Rohit Sharma) सरावाचा फोटो शेयर केला, यात तो कॉमेंटेटरच्या भूमिकेत दिसला.

15

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या आधी टीम इंडिया 20-22 जुलै दरम्यान काऊंटी टीमविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. या मॅचसाठी टीम इंडियाचे खेळाडू तयारी करत आहेत. भारताचा ओपनर रोहित शर्माने सरावाचा फोटो शेयर केला, यात तो कॉमेंटेटरच्या भूमिकेत दिसला. (Rohit Sharma Instagram)

25

रोहितने आपला बॅटिंग करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला. हातात बॅट आणि बॅटच्या मधोमध लागलेला बॉल, याची भावना वेगळीच असते, असं रोहित शर्मा त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला. याच्या एक दिवस आधीही रोहितने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला होता, यात तो सुट्टी संपली, काम सुरू असं म्हणाला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर टीम इंडियाचे खेळाडू 20 दिवसांच्या सुट्टीवर गेले होते. या सुट्टीत रोहित कुटुंबासोबत इंग्लडमध्ये फिरत होता. याचे फोटोही त्याने शेयर केले होते. (Rohit Sharma Instagram Screenshot)

35

रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. टीमलाही त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. यावर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध भारतात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये रोहित भारताचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता, त्याने 57.50 च्या सरासरीने 345 रन केले. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. (BCCI Twitter Screenshot)

45

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये रोहित अजिंक्य रहाणेनंतर सर्वाधिक रन करणारा भारतीय होता. रोहितने 12 टेस्टमध्ये 60.77 च्या सरासरीने 1094 रन केले होते, यात 4 शतकं आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता. फायनलमध्ये मात्र त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. पहिल्या इनिंगमध्ये 34 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 30 रन करून तो आऊट झाला होता. (Rohit Sharma Instagram)

55

रोहित आता 34 वर्षांचा आहे, त्यामुळे हा त्याचा अखेरचा इंग्लंड दौरा असेल. मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करणारा रोहित शर्मा या दौऱ्यात धमाकेदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल. रोहितने त्याच्या नावाला साजेशी कामगिरी केली, तर भारत 2007 नंतर पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकेल. (Rohit Sharma Instagram)

  • FIRST PUBLISHED :