ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय टीमने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात इतिहास घडवला. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताने 2-1 ने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर भारताचा हा लागोपाठ दुसरा सीरिज विजय होता. हा दौरा संपल्यानंतर अजिंक्य रहाणे मुंबईमध्ये त्याच्या घरी परतला.
घरी आल्यानंतर अजिंक्य रहाणेचं सोसायटीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. विठ्ठल काम यांची सून आदिती लिमये यांच्या कामत बेकरीमध्ये अजिंक्य रहाणेसाठी खास केक बनवण्यात आला होता.
अजिंक्य रहाणेला चॉकटेल आवडत असल्याने पूर्ण चॉकलेटचा हा केक बनवण्यात आला. यातल्या अजिंक्यच्या फोटोभोवती दिसणारी गोल्डन फोटो फ्रेमही खाता येईल, अशीच बनवण्यात आली होती.
आदिती लिमये-कामत यांनी आधीच अजिंक्यचं स्केच तयार केलं आणि हा केक बनवला. हेमंत पाटील यांनी हा केक ऑर्डर केला होता.
ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर आता अजिंक्य रहाणे 27 तारखेला पुन्हा एकदा टीम इंडियाच्या बायो-बबलमध्ये जाईल. 5 फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजला चेन्नईमधून सुरूवात होत आहे.