NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IND vs SA : शार्दुल ठाकूर वॉन्डरर्सचा 'लॉर्ड', कुंबळे-श्रीनाथलाही टाकलं मागे

IND vs SA : शार्दुल ठाकूर वॉन्डरर्सचा 'लॉर्ड', कुंबळे-श्रीनाथलाही टाकलं मागे

India vs South Africa 2nd Test : फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरने मंगळवारी टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास घडवला. जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स मैदानात 7 विकेट घेणारा तो भारताचा पहिलाच बॉलर ठरला आहे. याशिवाय त्याने करियरमध्ये पहिल्यांदाच 5 विकेट घेतल्या.

17

शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) मंगळवारी टेस्ट करियरमधली आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs South Africa 2nd Test) त्याने 61 रन देऊन 7 विकेट मिळवल्या आहेत. जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स मैदानातली भारतीय बॉलरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

27

आपल्या करियरमधली सहावी टेस्ट खेळणाऱ्या शार्दुलने पहिल्यांदाच 5 विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. याआधी 61 रनमध्ये 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 202 रन केले होते, पण शार्दुलच्या शानदार बॉलिंगमुळे दक्षिण आफ्रिकेचा 229 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे त्यांना फक्त 27 रनचीच आघाडी घेता आली.

37

वॉन्डरर्सच्या मैदानात आतापर्यंत फक्त 6 भारतीय खेळाडूंनाच इनिंगमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेता आल्या आहेत. शार्दुल ठाकूरआधी अनिल कुंबळेने (Anil Kumble) या मैदानात सर्वोत्तम कामगिरी केली होती. 1992 साली कुंबळने 53 रन देऊन 6 विकेट घेतल्या होत्या. हा सामना ड्रॉ राहिला होता.

47

टीम इंडिया या मॅचमध्ये विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकण्याचा विक्रमही करू शकते. भारताला आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. तीन मॅचच्या या सीरिजमध्ये भारतीय टीम 1-0 ने आघाडीवर आहे. सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा सहज विजय झाला होता.

57

शार्दुल ठाकूरशिवाय मोहम्मद शमीने (Mohammad Shami) 2018, एस श्रीसंतने (S Sreesanth) 2006, जसप्रीत बुमराहने 2018 (Jasprit Bumrah) साली आणि जवागल श्रीनाथने (Javagal Srinath) 1997 साली या मैदानात 5 विकेट घेतल्या होत्या. या मैदानातलं टीम इंडियाचं रेकॉर्डही चांगलं आहे. वॉन्डरर्समध्ये भारताने 5 टेस्ट खेळल्या, यातल्या 2 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला, तर 3 टेस्ट ड्रॉ झाल्या. म्हणजेच भारताने या मैदानात एकही टेस्ट गमावली नाही.

67

शार्दुल ठाकूर वॉन्डरर्समध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा परदेशी बॉलरही झाला आहे. याआधी 2005 साली इंग्लंडचा फास्ट बॉलर मॅथ्यू हॉगार्डनेही 61 रन देऊन 7 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय इतर कोणत्याही परदेशी बॉलरला इनिंगमध्ये 7 विकेट घेता आल्या नाहीत.

77

शार्दुल ठाकूर दक्षिण आफ्रिकेत टेस्ट इनिंगमध्ये 7 विकेट घेणारा दुसरा भारतीय बॉलर बनला आहे. याआधी ऑफ स्पिनर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) 2011 साली केप टाऊनमध्ये 120 रन देऊन 7 विकेट घेतल्या होत्या. तीन भारतीय बॉलरनी या देशात 6-6 विकेट घेतल्या आहेत.

  • FIRST PUBLISHED :