क्रिकेट आणि बॉलीवूड यांचं जवळचं नातं आहे. अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी लग्न केलं. अलिकडच्या खेळाडूंची नावे घ्यायची म्हटलं तर युवराज सिंग, विराट कोहली यांचे उदाहरण देता येईल.
अनेकदा अभिनेत्री सामने पाहण्यासाठी मैदानावर येत असतात. त्यांवेळी एखाद्या खेळाडूसोबत त्यांची भेट झाली तरी त्यांच्यात गुफ्तगू असल्याच्या बातम्या येतात.
सध्या भारतीय संघ वर्ल्ड कपसाठी इंग्लंडमध्ये आहे. भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहच्या अफेअरची चर्चा जोर धरू लागली आहे. दाक्षिणात्य अभिनेत्रीशी त्याचं नाव जोडलं जात आहे.
दक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन आणि बुमराहची सध्या चर्चा होत आहे. या दोघांच्या अफेअरची चर्चा झाल्यानंतर स्वत: अनुपमाने असे काही नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
बुमराह आणि अनुपमा हे दोघेही एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करतात. केवळ यावरून दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती.
अनुपमाने काही महिन्यांपूर्वी कन्नड चित्रपटातून पदार्पण केलं. तसेच तेलुगू भाषिक चित्रपटातही ती काम करत आहे. अनुपमासोबतच्या अफेअरबद्दल बुमराहने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
यापुर्वी बुमराहचे नाव अभिनेत्री राशी खन्नाशी जोडले गेले होते. त्यावेळी राशीनेसुद्धा असे काही नसल्याचे सांगितलं होतं.