NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / World Cup Point Table : पाकचा आफ्रिकेवर विजय, पाहा कोण कितव्या स्थानावर?

World Cup Point Table : पाकचा आफ्रिकेवर विजय, पाहा कोण कितव्या स्थानावर?

ICC Cricket World Cup 2019 : पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानं अजुनही त्यांची सेमिफायनलला पोहचण्याची आशा जिवंत आहे.

111

पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून वर्ल्ड कपमधील दुसऱ्या विजयाची नोेंद केली. यासह पाक पाच गुणांसह गुणतक्त्यात सातव्या स्थानावर पोहचले आहे.तर दक्षिण आफ्रिका नवव्या स्थानावर घसरले आहे.

211

वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवून न्यूझीलंडने गुणतक्त्यात अव्वल स्थान कायम राखले आहे. 11 गुणांसह ते पहिल्या स्थानावर आहेत. तर वेस्ट इंडिज आठव्या स्थानावर असून वर्ल्ड कपमधील त्यांचे आव्हान संपुष्टात आलं आहे.

311

ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर विजय मिळवून 10 गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावलं होतं मात्र ते न्यूझीलंडच्या वेस्ट इंडिजवर विजयाने पुन्हा दुसऱ्या स्थानावर आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेश 5 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

411

भारताने अफगाणिस्तानवर विजय मिळवून 9 गुणांसह गुणतक्त्यात तिसरे स्थान पटकावलं आहे.

511

इंग्लंडला लंकेवर विजय मिळवून अव्वल स्थानी झेप घेण्याची संधी होती. मात्र यात त्यांचा पराभव झाला तसेच भारताच्या अफगाणिस्तानवरील विजयाने इंग्लंडला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. त्यांचे सहा सामन्यात 8 गुण झाले आहेत.

611

वर्ल्ड कपमध्ये बलाढ्य समजल्या जाणाऱ्या इंग्लंडला पराभूत करून लंकेने स्पर्धेतील आव्हान जिंवत ठेवलं आहे. या विजयासह त्यांनी 6 गुणांसह गुणतक्त्यात पाचव्या स्थानी झेप घेतली. लंकेने आतापर्यंत 6 सामन्यात दोन विजय मिळवले तर दोन पराभव झाले. दोन सामने पावसाने रद्द झाले.

711

बांगलादेशने सहापैकी दोन सामने जिंकले तर तीन मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. ते सहाव्या स्थानावर आहेत. त्यांचे उर्वरित सामने अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध आहेत. यात एक जरी पराभव झाला तरी त्यांना सेमिफायनल गाठता येणार नाही. उरलेले तीनही सामने जिंकल्यास त्यांना संधी मिळू शकते. मात्र, धावगती कमी असल्याने त्यांना 'जर.. तर'च्या खेळावर अवलंबून रहावं लागेल.

811

अफगाणिस्तानचे पुढचे सामने बांगलादेश, पाकिस्तान, वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध आहेत. पाकिस्तानला न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध लढायचे आहे. तर दक्षिण आफ्रिकेला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे.

911

श्रीलंकेने इंग्लंडवर विजयासह 6 गुण मिळवले. सेमीफायनल गाठायची असेल तर त्यांना पुढचे सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. त्यांचे उर्वरीत सामने दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारताशी आहेत. वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या इंग्लंडला पराभूत करून लंकेनं भारताला जणू इशाराच दिला आहे.

1011

आठव्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडिजचे 6 सामन्यात 3 गुण, या संघांनाही वर्ल्ड कपमध्ये आव्हान जिवंत ठेवणं कठीण आहे. वेस्ट इंडिजचे पुढचे सामने न्यूझीलंड, भारत, अफगाणिस्तान आणि लंकेविरुद्ध आहेत. अफगाणिस्तानचा सहा सामन्यात पराभव झाला आहे. तर पाकिस्तानने 6 सामन्यात 5 गुण आणि दक्षिण आफ्रिकेचे 7 सामन्यात 3 गुण झाले आहेत. या तीनही संघांचे वर्ल्ड कपमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

1111

वर्ल्ड कपची बाद फेरी 9 जुलैला सुरू होणार आहे. पहिली सेमीफायनल 9 जुलैला मँचेस्टरवर होईल. त्यानंतर दुसरा सामना 11 जुलैला होणार आहे. तर अंतिम सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर 14 जुलैला होणार आहे.

  • FIRST PUBLISHED :