NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / हॉलिवूड अभिनेत्रीही तिच्यासमोर फिक्या, महिला क्रिकेटपटूला पाहून चाहते क्लीन बोल्ड!

हॉलिवूड अभिनेत्रीही तिच्यासमोर फिक्या, महिला क्रिकेटपटूला पाहून चाहते क्लीन बोल्ड!

इंग्लंडची फास्ट बॉलर लॉरेन बेलने भारताविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पदार्पणापासूनच लॉरेन सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लॉरेनच्या सौंदर्यावर अनेक क्रिकेट रसिक घायाळ झाले आहेत.

18

इंग्लंडच्या लॉरेन बेलने 172 किमीच्या वेगाने बॉल टाकून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली, पण नंतर ही चूक असल्याचं लक्षात आलं. लॉरेनने इंग्लंडसाठी भारताविरुद्धच्या सामन्यातून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. डेब्यू करताच लॉरेनने तिच्या वेगासोबतच सौंदर्यानेही लक्ष वेधून घेतलं. (Lauren Bell/Instagram)

28

पहिल्याच ओव्हरमध्ये लॉरेन बेलने स्मृती मंधानाला बॉल टाकला. स्पीडोमीटरमध्ये लॉरेन बेलने टाकलेला हा बॉल 107 मैल प्रती तास एवढा दाखवण्यात आला. शोएब अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद बॉल टाकला आहे. स्पीडोमीटरमध्ये शोएबने टाकलेल्या या बॉलची नोंद 100 मैल प्रती तास एवढी झाली होती. (Lauren Bell/Instagram)

38

21 वर्षांच्या लॉरेन बेलचा जन्म 2 जानेवारी 2001 ला झाला होता. तिने आतापर्यंत 1 टेस्ट, 2 वनडे आणि 1 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. टेस्टमध्ये तिला 1 आणि वनडेमध्ये 2 विकेट मिळाल्या आहेत. (Lauren Bell/Instagram)

48

लॉरेन बेलच्या सौंदर्यावर आणि स्माईलवर अनेक क्रिकेट रसिक घायाळ झाले आहेत. भारताविरुद्ध जेव्हा लॉरेनने पदार्पण केलं तेव्हाच ती सोशल मीडिया सेनसेशन झाली. लॉरेन बेल तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बरेच फोटो शेअर करते. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या 58 हजारांपेक्षा जास्त आहे. (Lauren Bell/Instagram)

58

लॉरेन बेलला इंग्लंड क्रिकेटमध्ये आन्या श्रुबसोलची उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जात आहे, कारण लॉरेन श्रुबसोलची कार्बन कॉपी म्हणून समोर येत आहे. (Lauren Bell/Instagram)

68

लॉरेनची उंची जास्त असल्यामुळे तिचे सहकारी खेळाडू तिला द शार्ड म्हणूनही हाक मारतात. लॉरेन बेल हंगरफोर्ड क्रिकेट क्लबसाठीही खेळली आहे. ती कॉलेज बॉयज फर्स्ट XI साठी खेळणारी पहिली महिला होती. (Lauren Bell/Instagram)

78

लॉरेनने 2015 साली बर्कशायरसाठी महिला काऊंटी चॅम्पियनशीपमधून पदार्पण केलं. पहिल्याच मोसमात तिने 8 सामन्यांमध्ये 7 विकेट घेतल्या. (Lauren Bell/Instagram)

88

लॉरेन बेलची बहिणही क्रिकेटपटू आहे. लॉरेनची बहिण कोलेट बर्कशायर आणि बर्मिंघमशायरसाठी खेळली आहे. (Lauren Bell/Instagram)

  • FIRST PUBLISHED :