कोरोनाच्या संकटात सर्व क्रिकेट सामने रद्द झाले असताना बुधवारपासून तब्बल 3 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्याला सुरुवात झाली. इंग्लड-वेस्ट इंडिज यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका होत आहे.
या सामन्यात मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. सामना सुरू होण्याआधीच इंग्लड-वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची गुडघे टेकले. याचे कारण म्हणजे अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्तीचा झालेला मृत्यू. यानंतर जगभरात ब्लॅक लाईफ मॅटर (Black Lives Matter) मोहिमेस सुरुवात झाली.
याच मोहिमेला इंग्लड-न्यूझीलंडच्या खेळाडूंनी समर्थन दर्शवत सामना सुरू होण्याआधी एक हात वर करत गुडघे टेकवले.
या सामनादरम्यान विंडीजच्या खेळाडूंनी उजव्या हातात काळा रंगाच्या फिती बांधल्या होत्या.
साऊथॅम्प्टन कसोटीपूर्वी वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंगनेही वर्णद्वेषाविरूद्ध जोरदार संदेश दिला.
होल्डिंग म्हणाले की वंशविद्वेषाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजाला शिक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे.
साऊथॅम्प्टन टेस्टमध्ये दोन्ही संघांनी वर्णद्वेषाविरूद्ध जर्सीवर 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' चा लोगो घातला होता. पोलिसांच्या क्रौर्यानंतर अमेरिकेत आफ्रिकन अमेरिकन जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूनंतर जगभरात वर्णद्वेषाचा विरोध झाला आहे.