NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / PHOTOS : दिव्यांग पती-पत्नीची कौतुकास्पद कामगिरी, उंचावलं भारताचं नाव, सरकारकडे केली ही मागणी

PHOTOS : दिव्यांग पती-पत्नीची कौतुकास्पद कामगिरी, उंचावलं भारताचं नाव, सरकारकडे केली ही मागणी

लहानपणापासूनच हे पती-पत्नी पॅरा बॅडमिंटनपटू आहेत. 2019 मध्ये त्यांनी चक्क व्हील चेअरवर बसून पॅरा बॅडमिंटनचा सराव सुरू केला आणि राज्यस्तरावर पदके जिंकली. त्यानंतर त्यांनी पंजाब राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करुन अनेक पदके जिंकली.

17

पण जितकी पदके आम्ही देशासाठी आतापर्यंत जिंकली आहोत, त्याचेही पैसे आम्हाला मिळालेले नाहीत, तसेच आम्हाला कोणती नोकरीही मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला उपजिविका भागवण्यासाठी दुसऱ्या कुणाकडे हात पसरवावे लागू नये, यासाठी लवकरात लवकर नोकरी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

27

या व्हील चेअर जोडप्याने सांगितले की, कोणत्याही मदतीशिवाय आम्ही देशाचा नावलौकिक मिळवत आहोत, मग सरकारने आम्हाला मदत केली तर आम्ही काय करू. त्यांनी सांगितले की, आमची मदत करण्यासाठी सर्वसामान्य लोक पुढे येत आहेत, पण आधीच्या सरकारने आम्हाला विचारले नाही आणि आताच्या सरकारने मदत केली नाही.

37

या व्हील चेअर जोडप्याने सांगितले की, कोणत्याही मदतीशिवाय आम्ही ही कामगिरी करत देशाचे नाव वाढवत आहोत. पण जर सरकारने आम्हाला मदत केली तर आम्ही काय नाही करू शकत. आमची मदत करण्यासाठी सर्वसामान्य लोक पुढे येत आहेत. मात्र, आम्हाला आधीच्या सरकारनेही विचारले नाही आणि आताच्या सरकारनेही कोणतीच मदत केली नाही.

47

जे तरुण दिव्यांग आहेत, तसेच चालू नाही शकत, अशा सर्वांसाठी हे दाम्पत्य प्रेरणा आहे. या दाम्पत्याने युवकांना असे आवाहन केले आहे की, त्यांनी कधीही हार मानू नये. दिव्यांग मुलांनी खेळाकडे लक्ष द्यावे, अभ्यासाकडे लक्ष द्यावे. कारण, भारतातील पोरं शिकतील तरच भारताचा विकास होईल.

57

विशेषत: आपण कोणावरही अवलंबून राहू नये, कठोर परिश्रम करा आणि आम्ही जसे यशस्वी झालो, तसे यशस्वी व्हा, असे आवाहन त्यांनी दिव्यांग तरुणांना केले.

67

या दाम्पत्याने पुढे सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यात अनेक अडचणी आल्या. पण आम्ही दोघांनीही हिंमत न हारता प्रत्येक आव्हान पार केल्यावर आम्ही आज याठिकाणी पोहोचू शकलो. खेळाच्या स्पर्धेसाठी देशाबाहेर जावे लागते, तरी हा सर्व खर्च शहरातील काही उद्योगपतींनी केला. त्याबद्दलही या दाम्पत्याने त्यांचे आभार मानले.

77

हे दाम्पत्य आधीच्या सरकारवर नाराज आहे. तसेच आताच्या सरकारकडे मदतीची आस लावून पाहत आहे. याबाबत या दाम्पत्याने सांगितले की, जर सरकारने आम्हाला मदत केली तर आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने खेळू शकू, तसेच स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देऊन पंजाबला गौरव मिळवून देऊ.

  • FIRST PUBLISHED :