NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IND vs ENG : टीम इंडियाच्या या दोन क्रिकेटपटूंवर नाराज झाले सुंदरचे वडील

IND vs ENG : टीम इंडियाच्या या दोन क्रिकेटपटूंवर नाराज झाले सुंदरचे वडील

टीम इंडियाचा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) चौथ्या टेस्टमध्ये शेवटच्या इनिंगमध्ये नाबाद 96 रनची खेळी केली.

14

टीम इंडियाचा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) चौथ्या टेस्टमध्ये शेवटच्या इनिंगमध्ये नाबाद 96 रनची खेळी केली. 174 बॉलचा सामना करताना त्याने 10 फोर आणि 1 सिक्स लगावली. एकावेळी भारताची स्थिती कमकवूत वाटत होती. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा स्कोअर 146-6 असा होता. अशा परिस्थितीमध्ये सुंदरने ऋषभ पंतसह सातव्या विकेटसाठी 113 रनची पार्टनरशीप केली. यानंतर त्याने अक्षर पटेलसोबतही 106 रन जोडले. पण सुंदरचं शतक फक्त 4 रननी हुकलं. पटेल रन आऊट झाल्यानंतर पुढच्या 4 बॉलमध्ये भारताने इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराजच्या विकेट गमावल्या.

24

भारताचा स्कोअर 365-7 असा होता, पण अक्षर पटेल रन काढण्याच्या नादात रन आऊट झाला. यानंतर बेन स्टोक्सने फक्त 4 बॉलमध्ये 2 विकेट घेतल्या. भारताची पहिली इनिंग 365 रनवर ऑल आऊट झाली होती. कोणीही पार्टनर नसल्यामुळे सुंदरला नाबाद परतावं लागलं.

34

सुंदरचे वडील एम.सुंदर यांनी इशांत आणि सिराजच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. आयएएनएससोबत बोलताना ते म्हणाले, 'तळाच्या बॅट्समननी ज्या पद्धतीने कामगिरी केली, ते पाहून मी निराश झालो. ते थोडावेळही टिकून बॅटिंग करू शकले नाहीत. जर भारताला विजयासाठी 10 रनची गरज असती, तर ही मोठी चूक नसती का? कोट्यवधी तरुण ही मॅच बघत होते. ज्या प्रकारे खालच्या खेळाडूंनी बॅटिंग केली, त्यांच्याकडून मुलांनी काहीच शिकलं नाही पाहिजे.'

44

सुंदरने आतापर्यंत 4 टेस्टमध्ये 66 च्या सरासरीने 265 रन केले आहेत. आपल्या छोट्याशा करियरमध्ये सुंदरने तीन अर्धशतकंही केली आहे. सुंदरने डिसेंबर 2017 साली श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी सुंदरचं वय फक्त 18 वर्ष 69 दिवस होतं. भारताकडून सुंदरने 26 टी20, 1 वनडे आणि 4 टेस्ट खेळल्या आहेत. यात त्याला 21, 1 आणि 6 विकेट मिळाल्या आहेत.

  • FIRST PUBLISHED :