NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / 19व्या वर्षीच शेफालीचा 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीसारखा चमत्कार; रचला इतिहास

19व्या वर्षीच शेफालीचा 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीसारखा चमत्कार; रचला इतिहास

भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेत शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली ICC अंडर-19 T20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला. फायनलमध्ये इंग्लंडला हरवून टीम इंडियाने ही ट्रॉफी जिंकली.

15

भारतीय महिला अंडर-19 संघाने ICC T20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने अंतिम फेरीत इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. ICC twitter page

25

भारतीय कर्णधार शफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचा संघ 17.1 षटकांत 68 धावांत गारद झाला. तितास संधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोप्रा यांनी 2-2 बळी घेतले. मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि सोनम यादव यांनी 1-1 विकेट आपल्या नावावर केली.- ICC twitter page

35

भारताने 14व्या षटकातच 3 विकेट्सच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले आणि अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाची पहिली ट्रॉफी जिंकली. शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावत बाद झाल्यानंतर सौम्या तिवारी आणि गोंगडी त्रिशा यांनी 24-24 डाव खेळत संघाला विजयापर्यंत पोहचवला. ICC twitter page

45

शेफाली वर्माने वयाच्या 19 व्या वर्षी आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक जिंकून महेंद्रसिंग धोनीच्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली आहे. 2007 साली दक्षिण आफ्रिकेत खेळलेला पहिला ICC T20 विश्वचषक जिंकला भारताने धोनीच्या नेतृत्वात उंचावला होता. AFP

55

धोनीच्या संघाने 2007 च्या T20 विश्वचषक फायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून ट्रॉफी जिंकली होती. महिलांच्या 19 वर्षांखालील संघाने इंग्लंड संघाला एकतर्फी लढतीत पराभूत करून ट्रॉफी जिंकली. ICC twitter page

  • FIRST PUBLISHED :