NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / ऋद्धीमान साहानं BCCI ला सांगितलं 'त्या' पत्रकारचं नाव! द्रविड, गांगुलीबद्दल म्हणाला...

ऋद्धीमान साहानं BCCI ला सांगितलं 'त्या' पत्रकारचं नाव! द्रविड, गांगुलीबद्दल म्हणाला...

टीम इंडियाचा विकेटकिपर-बॅटर ऋद्धीमान साहानं (Wriddhiman Saha) अखेर मौन सोडलं आहे. साहानं त्याला धमकी देणाऱ्या पत्रकाराचं नाव बीसीसीआयला सांगितले आहे.

16

मुंबई, 6 मार्च : टीम इंडियाचा विकेटकिपर-बॅटर ऋद्धीमान साहानं (Wriddhiman Saha) अखेर मौन सोडलं आहे. साहानं त्याला धमकी देणाऱ्या पत्रकाराचं नाव बीसीसीआयला सांगितले आहे. बीसीसीआयनं या विषयावर 3 सदस्यांची विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीला आपण सर्व माहिती दिली आहे, असे साहाने स्पष्ट केले. (AFP)

26

ऋद्धीमान साहानं मागच्या महिन्यात सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर केले होते. त्यामध्ये साहाला एका पत्रकारानं धमकी दिली होती. (Twitter)

36

साहानं धमकी देणाऱ्या पत्रकाराचं नाव जाहीर करावं, अशी विनंती वीरेंद्र सेहवागसह अनेक माजी क्रिकेटपटूंनी केली होती. (Twitter)

46

'मी बीसीसीआयला सर्व काही सांगितलं आहे, काहीही लपवलं नाही. आता बीसीसीआयची समिती या विषयावर अंतिम निर्णय घेईल,' अशी माहिती साहानं 'स्पोर्ट्स तक'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे. (Instagram)

56

साहानं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि हेड कोच राहुल द्रविडबाबतही गौप्यस्फोट केला होता. या प्रकरणात काही बोलण्यास साहानं नकार दिला. 'मी या विषयावर काही बोलणार नाही. मला बीसीसीआयनं तशी सूचना केली आहे. आता भारतीय क्रिकेट बोर्ड या विषयावर खुलासा करेल.' असे साहाने स्पष्ट केले. (AFP)

66

साहानं गेल्या महिन्यामध्ये स्क्रीनशॉट शेअर केला होता. यामध्ये त्याला पत्रकारानं धमकी दिल्याचं उघड झाल्यानं खळबल माजली होती. धमकी देणाऱ्या पत्रकाराचे नाव जाहीर करण्यास साहानं नकार दिला होता. त्यानंतर बीसीसीआयनं या प्रकरणात हस्तक्षेप करत 3 सदस्यीय समितीची स्थापना केली. (AFP)

  • FIRST PUBLISHED :