NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / David Warner : ब्रॉड पुन्हा एकदा वॉर्नरसाठी बनला काळ; स्टुअर्ट मॅकग्राच्या क्लबमध्ये झाला सामील

David Warner : ब्रॉड पुन्हा एकदा वॉर्नरसाठी बनला काळ; स्टुअर्ट मॅकग्राच्या क्लबमध्ये झाला सामील

David Warner : बर्मिंगहॅम कसोटीच्या पहिल्या डावात डेव्हिड वॉर्नरला 9 धावांवर खेळत असताना स्टुअर्ट ब्रॉडने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ब्रॉडने वॉर्नरला आपला बळी बनवण्याची ही 15वी वेळ आहे.

16

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि इंग्लिश वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा चाहत्यांना एक रोमांचक लढाई पाहायला मिळते. (एपी)

26

सध्या सुरू असलेल्या 'अॅशेस' मालिकेतही असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. बर्मिंगहॅम कसोटीच्या पहिल्या डावात दोन्ही खेळाडूंमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ब्रॉड विकेट काढण्यात यशस्वी झाला. (एएफपी)

36

बर्मिंगहॅम कसोटीच्या पहिल्या डावात नऊ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर वॉर्नरला बॉलिंग करून ब्रॉडने माघारी धाडले. ब्रॉडने वॉर्नरला आपला बळी बनवण्याची ही 15वी वेळ आहे. (स्टुअर्ट ब्रॉड/इन्स्टाग्राम)

46

वॉर्नरने आतापर्यंत ब्रॉडविरुद्ध इंग्लंडच्या भूमीवर एकूण 329 चेंडूंचा सामना केला आहे. दरम्यान, त्याच्या बॅटमधून 158 धावा निघाल्या आहेत. त्याचबरोबर ब्रॉडने त्याला नऊ वेळा आपला बळी बनवले आहे. (डेव्हिड वॉर्नर/इन्स्टाग्राम)

56

'अॅशेस'मध्ये सर्वाधिक वेळा फलंदाजाला बाद करण्याचा विशेष विक्रम ग्लेन मॅकग्राच्या नावावर आहे. मॅकग्राने मायकेल अथर्टनला 19 वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. (ग्लेन मॅकग्रा/इन्स्टाग्राम)

66

अॅलेक बेडसर, एच ट्रंबूल आणि ब्रॉड यांची नावे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. बेडसरने आर्थर मॉरिसला 18, ट्रंबूलने हेवर्डला 15 आणि ब्रॉडने 15 वेळा वॉर्नरला बाद केले. (स्टुअर्ट ब्रॉड/इन्स्टाग्राम)

  • FIRST PUBLISHED :