NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Sourav Ganguly :सौरव गांगुलीच्या वक्तव्याने खळबळ, World cup ची तुलना..; रोहित शर्माच्या कर्णधारपदाशी संबंधित प्रकरण

Sourav Ganguly :सौरव गांगुलीच्या वक्तव्याने खळबळ, World cup ची तुलना..; रोहित शर्माच्या कर्णधारपदाशी संबंधित प्रकरण

Sourav Ganguly : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशात माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली रोहितच्या समर्थनात मैदानात उतरले आहे. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास असून त्याने 5 आयपीएल जिंकले आहेत जे वर्ल्डकपपेक्षा कठीण वाटतात.

15

सलग दुसऱ्यांदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचल्यानंतरही भारताला रिकाम्या हाताने परतावे लागले. इंग्लंडमधील ओव्हल येथे ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्ध २०९ धावांनी मोठा विजय मिळवत ट्रॉफीवर कब्जा केला. भारतासमोर 444 धावांचे लक्ष्य होते, त्यापुढे टीम इंडियाचा दुसरा डाव केवळ 234 धावांवर आटोपला. AP

25

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाल्यापासून कर्णधार रोहित शर्मा टीकेचा धनी झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघ गेल्या वेळी पराभूत झाला होता. आता सलग दुसऱ्यांदा भारताला कसोटी चॅम्पियनशिप जिंकता आली नाही. यावेळी कर्णधारपद रोहित शर्माकडे असून पराभवामुळे त्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.-एपी

35

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी असे वक्तव्य केल्याने वाद निर्माण होऊ शकतो. माजी भारतीय कर्णधाराने बीसीसीआयची इंडियन प्रीमियर लीग जिंकणे हे आयसीसी विश्वचषक जिंकण्यापेक्षा मोठे असल्याचे विधान केले आहे. टीकाकारांना रोहित शर्माच्या कर्णधारपदावर विश्वास ठेवण्याचा सल्ला देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.- (ICC TWITTER)

45

टीव्ही टुडे नेटवर्कशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला की, माझा रोहित शर्मावर पूर्ण विश्वास आहे. त्याच्या आणि महेंद्रसिंग धोनीच्या नावावर 5 आयपीएल ट्रॉफी आहेत. आयपीएलची ट्रॉफी जिंकणे सोपे काम नाही कारण ही स्पर्धा खूप खडतर आहे. मला वाटते की आयपीएल ट्रॉफी जिंकणे हे विश्वचषक जिंकण्यापेक्षा कठीण आहे.- बीसीसीआय

55

आपला मुद्दा पुढे नेत गांगुली म्हणाला, तुम्हाला इंडियन प्रीमियर लीगमध्ये 14 सामने खेळायचे आहेत, तरच तुम्हाला नॉट आउट सामन्यात स्थान मिळते. दुसरीकडे, वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर, केवळ 4 किंवा 5 सामने खेळल्यानंतर तुम्हाला उपांत्य फेरीत स्थान मिळते. स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठी तुम्हाला आयपीएलमध्ये 17 सामने खेळावे लागतात. बीसीसीआय

  • FIRST PUBLISHED :