रवींद्र जडेजाने 17 एप्रिल 2016 मध्ये रीवाबा सोलंकीशी लग्न केले. खरे तर जडेजाच्या कुटुंबीयांची इच्छा होती की त्याने लवकर लग्न करावे पण हा जडेजा क्रिकेटमध्ये इतका मग्न होता की त्याचे इतर गोष्टींकडे लक्ष नव्हते. याचवेळी जडेजाच्या बहिणीने त्याची ओळख तिची मैत्रीण असलेल्या रिवाबा सोलंकीशी करून दिली.
जडेजा आणि रीवाबा हे दोघे एका पार्टीत भेटले होते आणि या भेटीतच जडेजाला रीवाबा आवडली. या भेटीनंतरच दोघांनी नंबरची देवाणघेवाण केली होती. येथूनच दोघांचे प्रेम सुरू झाले आणि प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले.
जडेजा आणि रिवाबा यांची पहिल्या भेटीच्या तीन महिन्यांतच त्यांचा साखरपुडा झाला. यानंतर लगेचच दोघांनी एप्रिल 2016 मध्ये लग्न केले . लग्नाच्या दिवशी जडेजाने गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर दुसरीकडे रिवाबा पारंपारिक लाल, हिरव्या आणि केशरी रंगाच्या लेहेंग्यात दिसली.
रवींद्र जडेजा मैदानावरील त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. असाच आक्रमकपणा त्याच्या लग्नातही पाहायला मिळाला. जडेजाचे लग्न सुरु असताना त्याच्या नातेवाईकांनी हवेत मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला होता, ज्यामुळे पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती.
जडेजा राजपूत कुटुंबातील असल्याने त्यांच्या लग्नसमारंभात गोळीबार करणे येथे सामान्य असते. यामुळेच जडेजाच्या लग्नातही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. परंतु उत्साहाच्या भरात मोठ्या प्रमाणावर हवेत गोळीबार झाल्याने परिसरातील लोकांनी याबाबत पोलिसात तक्रार केली होती.