NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Cricket : बीसीसीआय देणार रिंकू- ऋतुराजला संधी! आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियातून खेळणार

Cricket : बीसीसीआय देणार रिंकू- ऋतुराजला संधी! आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियातून खेळणार

भारत विरुद्ध वेस्टइंडीज यांच्यात होणाऱ्या टी 20 मालिकेसाठी रिंकू सिंह याची निवड न झाल्याने टीम इंडियाच्या सिलेक्टर्सवर अनेक ताशेरे ओढण्यात आले होते. परंतु आता रिंकू सिंहच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रिंकूला भारतीय निवड समितीने आयर्लंड दौऱ्यावर पाठवण्याची तयारी केली आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर भारत आयर्लंड विरुद्ध टी 20 सामन्यांची मालिका खेळणार असून याला 18 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे.

15

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या रिंकू सिंहने यंदा आयपीएल २०२३ मध्ये खेळताना त्याच्या बॅटिंगने धमाका केला. भारतीय निवड समिती यंदाच्या आयपीएलमध्ये चांगले परफॉर्म करणाऱ्या तरुण खेळाडूंना भारतीय संघात खेळण्याची संधी देत आहे. परंतु अशावेळी रिंकूला वेस्टइंडीज दौऱ्यावर न पाठवल्याने त्याचे चाहते नाराज झाले होते. परंतु यंदा बीसीसीआयकडून रिंकू सिंह आणि ऋतुराज गायकवाड या दोघांना भारताच्या आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात सामील केले जाणार असल्याची शक्यता आहे.

25

रिंकू सिंह सह आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स कडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडला देखील आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियामध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे. ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपरकिंग्ससाठी यंदाच्या आयपीएलमध्ये तब्बल 590 धावा केल्या होत्या.

35

बीसीसीयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या वनडे टीममध्ये सामील असलेले 6 खेळाडू हे आयर्लंड दौऱ्यात होणाऱ्या टी 20 सिरीजछा भाग होणार नाहीत. कारण त्यांना पुन्हा आशिया कप देखील खेळायचा आहे.

45

रिंकू सिंग आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंचा आयर्लंड मालिकेसाठी संघात समावेश करण्यात येणार आहे. कारण चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्स 2023 साठीही बोर्डाला एक संघ पाठवावा लागणार आहे. अशा परिस्थितीत निवड समितीने वेगवेगळ्या मालिकांमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसरा टी-20 सामना 20 ऑगस्टला तर तिसरा आणि शेवटचा सामना 23 ऑगस्टला खेळवला जाईल.

55

वेगवेगळ्या दौऱ्यांवर खेळाडूंची चाचणी घेता यावी आणि त्यांना जास्तीत जास्त सामन्यांचा सराव करता यावा यासाठी भारतीय निवड समितीने भारत अ संघाचे दौरे वाढवण्याची मागणी बोर्डाकडे केली आहे.

  • FIRST PUBLISHED :