मुंबई, 4 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) आयपीएल 2022 मध्ये निराशाजनक सुरूवात झाली आहे. सीएकेनं स्पर्धेतील पहिल्या 3 मॅच गमावल्या आहेत. पंजाब किंग्ज विरूद्ध तिसरा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर 'मिस्टर आयपीएल' म्हणजेच सुरेश रैनाची जोरदार चर्चा सुरू आहे. (Suresh Raina Instagram)
सीएसकेला या सिझनमध्ये अद्याप एकही विजय मिळालेला नाही. त्यामुळे फॅन्सनी रविंद्र जडेजाच्या कॅप्टनसीवर प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे. धोनीनं या सिझनपूर्वी जडेजाकडे कॅप्टनसी दिली होती. त्याचबरोबर सुरेश रैनाचा टीममध्ये पुन्हा समावेश करण्याची मागणी केली जात आहे. (pc: AFP)
आयपीएल 2022 पूर्वी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये रैनाला सीएसकेनं रिलीज केले होते. त्यानंतर त्याला ऑक्शनमध्येही खरेदी केले नाही. रैना यंदा अनसोल्ड ठरला होता. (AFP)
आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच सुरेश रैना अनसोल्ड ठरला. तो सध्या या स्पर्धेची कॉमेंट्री करत आहे.
सीएसकेच्या तिसऱ्या पराभवानंतर सुरेश रैना सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहे. रैनाला बॅटींगसाठी नाही तर लकी चार्म म्हणून बेस प्राईजमध्ये घ्यावं अशी मागणी करण्यात येत आहे.
सीएसकेचा तिसरा पराभव म्हणजे रैनाच्या नावावर पुन्हा एकदा विचार करण्याची तिसरी वॉर्निंग असल्याचं मत एका फॅननं व्यक्त केलं आहे.