मुंबई, 16 मार्च : माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) या आयपीएलमध्ये नवी इनिंग सुरू करू शकतो. टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्रींसोबत (Ravi Shastri) तो इनिंग सुरू करणार आहे. (Instagram)
सुरेश रैना आणि रवी शास्त्री हे दोघंही आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान कॉमेंट्री करताना दिसतील. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये (IPL Auction 2022) रैनाला कोणत्याही टीमनं खरेदी केलं नव्हतं. (Instagram)
रवी शास्त्रींचा टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर नव्या आयपीएल टीमचे कोच म्हणूनही त्यांचे नाव चर्चेत होते. पण, प्रत्यक्षात तसं झालं नाही. (Instagram)
आयपीएल स्पर्धेचा मोठा अनुभव असलेला सीएसकेचा दिग्गज क्रिकेटपटू सुरेश रैना यंदाच्या ऑक्शनमध्ये पहिल्यांदाच अनसोल्ड ठरला. या ऑक्शनंतर काही खेळाडूंनी माघार घेतल्यानंतरही बदली खेळाडू म्हणून त्याची कुणी निवड केली नाही. (AFP)
रवी शास्त्री 2017 साली टीम इंडियाचे कोच झाले होते. त्यानंतर ते पहिल्यांदाच कॉमेंटेटर म्हणून पुनरागमन करत आहेत. ते आणि सुरेश रैना हिंदीमध्ये कॉमेंट्री करणार आहेत. विशेष म्हणजे क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर शास्त्री यांनी बहुतेक काळ इंग्रजीमधून कॉमेंट्री केली आहे. ते आता पहिल्यांदाच नव्या भूमिकेत दिसणार आहेत. (AFP)
'सुरेश रैना आता आयपीएल टीमचा सदस्य नाही. पण त्याच्या फॅन्सची संख्या मोठी आहे. तो मिस्टर आयपीएल म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे या स्पर्धेशी त्याला जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे,' असे या विषयावरील सूत्रांनी सांगितलं. शास्त्री यांनीही हेड कोच झाल्यानंतर एकदाही कॉमेंट्री केलेली नाही. (AFP)
सुरेश रैना 2008 पासून आयपीएल स्पर्धेत खेळला आहे. त्याने 205 मॅचमध्ये 1 शतक आणि 39 अर्धशतकांच्या जोरावर एकूण 5528 रन केले आहेत. तो गुजरात लायन्स या टीमचा कॅप्टनही होता. (AFP)
रवी शास्त्री यांनीही हिंदीची शिकवणी सुरू केली आहे. या विषयावरी तज्ज्ञांकडून ते हिंदीचे धडे घेत आहेत. तसंच त्यांनी कॉमेंट्री करण्याचा सराव देखील सुरू केला आहे. त्यामुळे आगामी आयपीएल सिझनमध्ये शास्त्रींची एन्ट्री खास ठरणार आहे. (Instagram)