मुंबई, 6 मे : आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या उमरान मलिकनं (Umran Malik) सातत्यानं फास्ट बॉलिंग करत दहशत निर्माण केली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये उमरानला एकही विकेट मिळाली नाही. पण, त्यानं नवा रेकॉर्ड केला आहे. (PTI)
उमराननं दिल्ला कॅपिटल्स विरूद्धच्या मॅचमध्ये (SRH vs DC) आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा फास्ट बॉल टाकला. (Sunrisers Hyderabad Instagram)
दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध उमराननं 157 किलोमीटर वेगानं बॉल टाकला.आयपीएलमध्ये त्याच्यापेक्षा वेगानं बॉल फक्त शॉन टेटनं (157.7 किमी) टाकला आहे. विशेष म्हणजे उमराननं काही दिवसांपूर्वीच 155 किमीपेक्षा जास्त वेगानं बॉलिंग करण्याचा संकल्प जाहीर केला होता. तो संकल्प त्यानं पूर्ण केला आहे.(PTI)
आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या एनरिक नॉर्कियानं प्रती तास 156.2 किमी वेगानं बॉल टाकला होता. उमराननं त्याचा रेकॉर्ड मोडला आहे. (Umran Malik Instagram)
सनरायझर्स हैदराबादनं उमरानला रिटेन केले होते. त्यानं या सिझनमध्ये आत्तापर्यंत 9 मॅचमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. (Umran Malik Instagaram )
उमरान मलिकचा टीम इंडियात समावेश करावा अशी मागणी अनेक माजी क्रिकेटपटूंनी केली आहे. (Umran Malik Instagram)