श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) पदार्पणातील टेस्टमध्ये शतक झळकात विशेष खेळाडूंच्या गटात जागा मिळवली आहे. त्याच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती नाही. श्रेयसप्रमाणे त्याची बहिण श्रेष्ठा अय्यर देखील प्रसिद्ध आहे. श्रेष्ठा एक प्रोफेशनल डान्स आणि कोरिओग्राफर असून सोशल मीडियावर तिचे मोठे फॅन्स आहेत. (Shresta Iyer Instagram)
श्रेष्ठा अय्यर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय दिसते. तिनं तिच्या कामाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. श्रेयसनंही बहिणीबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केलेले आहेत. (Shresta Iyer Instagram)
श्रेयस अय्यरला न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानं पहिल्याच इनिंगमध्ये 105 रन काढले. तो यापूर्वी वन-डे आणि टी20 मॅच खेळला आहे. तसंच आयपीएल टीमचा कॅप्टनही होता. (Shresta Iyer Instagram)
श्रेष्ठा अय्यरला प्राण्यांबद्दल विशेष प्रेम आहे. अय्यर परिवार मुंबईत राहत असला तरी मुळचा केरळचा आहे. श्रेयसनं 2014 साली फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने या क्रिकेटमध्ये 4500 पेक्षा जास्त रन केले असून 13 शतक झळकावले आहेत. (Shresta Iyer Instagram)
श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएल 2021 मधील (IPL 2021) पहिल्या टप्प्यात खेळू शकला नव्हता. टी20 वर्ल्ड कपमध्ये राखीव खेळाडू म्हणून त्याचा समावेश होता. कानपूर टेस्टपूर्वी केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्यानं त्याला पदार्पणाची संधी मिळाली. (Shreyas Iyer Instagram)
टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावलेला श्रेयस हा 16 वा भारतीय आहे. विशेष म्हणजे या यादीत शेवटचे तीन्ही मुंबईकर आहेत. श्रेयसच्यापूर्वी रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ या मुंबईकरांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावले आहे. (Shreyas Iyer Instagram)