मुंबई, 4 सप्टेंबर : रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्टमध्ये ओपनिंग बॅट्समन बनलाय तेव्हापासून त्याच्या बॅटनं संपूर्ण क्रिकेट विश्वावर राज्य केलंय. तो आता टेस्ट क्रिकेटमध्ये टॉप रँकिंग असलेला भारतीय बॅट्समन बनलाय. त्याचबरोबर त्यानं ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या दिवशी एक मोठा रेकॉर्ड केला आहे. (AFP)
रोहितनं शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 हजार रन (Rohit Sharma 15000 International Runs) रन पूर्ण केले. हा रेकॉर्ड करणारा रोहित हा आठवा भारतीय आहे. यापूर्वी सचिन, द्रविड, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद अझहरुद्दीन यांनी 15 हजारपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय रन केले आहेत. (PIC: AP)
रोहित शर्मानं 397 इनिंगमध्ये 15 हजार आंतरराष्ट्रीय रन केले आहेत. विराटनं 333 इनिंगमध्ये हा टप्पा पूर्ण केला होता. तर सचिननं 356 इनिंगमध्ये 15 हजार रन केले आहेत. (PIC: AFP)
रोहित शर्मा 2013 साली वन-डे क्रिकेटमध्ये ओपनिंग बॅट्समन बनला. त्यानं वन-डे मध्ये 3 द्विशतक झळकावली आहेत. वर्ल्ड कपमध्ये रोहितनं शतकांचा विक्रम केला. आता टेस्ट क्रिकेटमध्येही ओपनिंग बॅट्समन झाल्यापासून त्यानं सातत्यानं रन करण्यास सुरूवात केली आहे. ( Rohit Sharma Instagram)
रोहित शर्मानं आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये विराट कोहलीला मागं टाकलं आहे. तो सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. 1 सप्टेंबर 2019 रोजी त्याचे रँकिंग 53 होते. (AP)
इंग्लंड विरुद्ध सध्या सुरू असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये रोहितनं आत्तापर्यंत 8 इनिंगमध्ये 43.60 च्या सरासरीनं 261 रन केले आहेत. रोहितकडून ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये मोठ्या स्कोअरची अपेक्षा आहे. (AFP)