NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / हरभजनसह 'या' क्रिकेटपटूंनी खेळली राजकीय इनिंग, कुणी पास तर काही फेल!

हरभजनसह 'या' क्रिकेटपटूंनी खेळली राजकीय इनिंग, कुणी पास तर काही फेल!

क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलेला हरभजन सिंग (Harbhajan Singh) लवकरच त्याच्या नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे. या महिन्याच्या शेवटी राज्यसभेसाठी आम आदमी पक्षाला पाच जागा मिळणार आहेत. यातलं पहिलं नाव हरभजन सिंगचं असू शकतं.

16

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी निवृत्तीनंतर राजकीय पिचवर पदार्पण केले. त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरली. सिद्धू 2004 साली पहिल्यांदा भाजपाचे खासदार झाले. ते दोन वेळा भाजपा खासदार होते. त्यांनी 2017 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा ते काँग्रेसमधूनही निवडून आले. नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. (Photo- Instagram)

26

टीम इंडियाचा माजी ओपनर गौतम गंभीरने 2019 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. गंभीर सध्या पूर्व दिल्लीचा खासदार आहे. (Photo - Instagram)

36

भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी सध्या बंगालचा क्रीडामंत्री आहे. त्याने 2021 साली तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तो बंगालमधील सिबपर मतदारसंघाचा आमदार आहे. (Photo- Instagram)

46

टीम इंडियाचा माजी कॅप्टन मोहम्मद अझहरूद्दीननं (Mohammad Azharuddin) 2009 साली राजकीय इनिंग सुरू केली. अझरनं तेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अझर मुरादाबादचा खासदार होता. (Photo- Instagram)

56

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद (Kirti Azad) यांनी निवृत्तीनंतर भाजपामध्ये प्रवेश केला. ते गोल मार्केट विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. आझाद यांनी 2014 साली बिहारमधील दरभंगामधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. (Photo- Instagram)

66

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान (Chetan Chauhan) 1991 साली पहिल्यांदा भाजपाचे खासदार झाले. त्यांना 1999 आणि 2004 साली पराभव सहन करावा लागला. 2017 साली ते उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. 2018 साली ते उत्तर प्रदेशचे क्रीडा मंत्री झाले. 2020 साली या दिग्गज क्रिकेटपटूचं निधन झालं. (Photo-Instagram)

  • FIRST PUBLISHED :