NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2021: ग्लेन मॅक्सवेल होणार भारताचा जावई, वाढदिवशी आली मोठी अपडेट

IPL 2021: ग्लेन मॅक्सवेल होणार भारताचा जावई, वाढदिवशी आली मोठी अपडेट

ऑस्ट्रेलिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwel) लवकरच भारताचा जावई होणार आहे. मॅक्सवेलची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमन (Vini Raman) हिनं याबाबत खुलासा केला आहे.

17

मुंबई, 15 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwel) लवकरच भारताचा जावई होणार आहे. मॅक्सवेलची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमन (Vini Raman) हिनं याबाबत खुलासा केला आहे. (इन्स्टाग्राम)

27

मॅक्सवेलचा गुरुवारी (14 ऑक्टोबर) वाढदिवस झाला. त्या दिवशी विनीनं इन्स्टाग्राम स्टोरीतून हे जाहीर केलं आहे. 'मॅक्सवेल वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुझ्याशी लग्न करण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही, 2022 हे आपलं वर्ष असेल,' असं विनीनं गुरुवारी जाहीर केलं (इन्स्टाग्राम)

37

मॅक्सवेल आणि विनी बराच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली मॅक्सवेलनं मानसिक कारणामुळे क्रिकेटपासून ब्रेक घेतला होता. त्यावेळी विनीनं त्याला वाईट कालखंडातून बाहेर काढलं असा खुलासा मॅक्सवेलनंच केला होता. (इन्स्टाग्राम)

47

मॅक्सवेल आणि विनी यांनी मागच्या वर्षी भारतीय पद्धतीनुसार साखरपुडा केला होता. या कार्यक्रमाला दोन्ही कुटंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. ( इन्स्टाग्राम)

57

मॅक्सवेल आणि विनी 2017 पासून एकमेकांना डेट करत आहेत. ते काही महिन्यांपूर्वी एकत्र युरोप टूरलाही गेले होते. (इन्स्टाग्राम)

67

2019 च्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कार कार्यक्रमातही ही जोडी एकत्र होती. भारतीय वंशाची विनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये स्थायिक झाली आहे. तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार ती फार्मासिस्ट आहे. (इन्स्टाग्राम)

77

मॅक्सवेलनं या आयपीएल सिझनमध्ये जोरदार कामगिरी केली आहे. पण त्याची आरसीबी टीम आयपीएल फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरली. आता तो टी20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळताना दिसणार आहे. (इन्स्टाग्राम)

  • FIRST PUBLISHED :