मुंबई हिरोज या संघात बॉलिवूड तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेत्यांचा समावेश आहे. अभिनेता रितेश देशमुख हा या संघाचा कर्णधार असून यासह शरद केळकर, सुनील शेट्टी, सोहेल खान, माधव देवचक्के यासारखे अनेक स्टार्स CCL 2023 मध्ये आहेत.
तसेच किच्चा सुदीप आणि अखिल अक्किनेनी यासारखे कलाकार देखील CCL 2023 मध्ये क्रिकेट खेळणाना दिसत आहेत.
सध्या या स्पर्धेत आतपर्यंत 13 सामने खेळवले गेले असून यात प्रत्येकी 2 सामने जिंकून भोजपुरी दबंग आणि तेलगू वॉरियर्स हे संघ आता सर्वोच्च स्थानी आहे.
सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे सामने जयपूर, हैदराबाद, रायपूर, जोधपूर, बेंगळुरू आणि तिरुवनंतपुरम या प्रमुख शहरांमध्ये आयोजित केले जात आहेत.
सेलिब्रिटी क्रिकेट लीग 2023 सामन्यांचे थेट प्रक्षेपण झी अनमोल सिनेमा हिंदी, झी अनमोल सिनेमा पिक्चर्स इंग्लिश, झी थिराई तमिळ, झी सिनेमालु तेलुगू, झी पिक्चर्स कन्नड, प्लावर्स टीव्ही मल्याळम, पीटीसी पंजाबी, झी बांगला सिनेमा आणि झी भोजपुरी या चॅनेलवर प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.