टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) मागच्याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर आता ही आयपीएल (IPL) त्याची अखेरची असेल, असं बोललं जात आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने (CSK) 2010, 2011 आणि 2018 अशा तीन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली.
2021 च्या मोसमातही चेन्नई पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 2022 साली आयपीएलचा मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे पुढच्या मोसमात धोनीची काय भूमिका असेल? तो चेन्नईच्या टीमसोबतच असेल, का दुसऱ्या टीम त्याच्यावर बोली लावतील? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी स्पिनर ब्रॅड हॉगने (Brad Hogg) या प्रश्नाचं उत्तर दिलं. आयपीएलच्या दुसऱ्या टीमकडून धोनी खेळणार नाही, असं हॉग म्हणाला.
धोनी खेळाडू म्हणून चेन्नईकडून खेळला नाही, तर तो टीमच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडेल.
धोनी चेन्नई सुपरकिंग्सला सोडणार नाही, कारण तो या टीमचा महाराजा आहे, असं ट्वीट हॉगने केलं.