NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / अजिंक्य रहाणेच्या मुलाचं मराठमोळं बारसं, पाहा काय ठेवलं नाव

अजिंक्य रहाणेच्या मुलाचं मराठमोळं बारसं, पाहा काय ठेवलं नाव

Ajinkya Rahane अजिंक्य रहाणेच्या मुलाचं बारसं मोठ्या दिमखात पार पडलं. अजिंक्यची पत्नी राधिका हिने बारशाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

17

भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याच्या मुलाचं बारसं झालं आहे. मराठमोळ्या पद्धतीने अजिंक्य रहाणेच्या मुलाच्या बारशाचा कार्यक्रम पार पडला. (Photo- Radhika Dhopavkar)

27

अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका धोपावकरने बारशाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo- Radhika Dhopavkar)

37

अजिंक्य आणि राधिकाने त्यांच्या मुलाचं नाव राघव ठेवलं आहे. प्रभू श्रीरामाला राघव म्हणलं जातं. दसऱ्याच्या दिवशी ऑक्टोबर 2022 मध्ये अजिंक्य आणि राधिकाला मुलगा झाला, त्यामुळे अजिंक्यने श्रीरामाच्या नावावरून मुलाचं नाव ठेवलं का? अशा चर्चा सोशल मीडियात सुरू झाल्या आहेत.

47

अजिंक्य आणि राधिका यांना एक मुलगीही आहे, तिचा जन्म ऑक्टोबर 2019 साली झाला होता. अजिंक्यच्या मुलीचं नाव आर्या असं आहे. (Photo- Radhika Dhopavkar)

57

राधिकाने शेअर केलेल्या बारशाच्या फोटोंमध्ये पूर्ण कुटुंब दिसत आहे. अजिंक्य बाळाला कडेवर घेऊन येत असतानाचा फोटोही आहे. या फोटोंमध्ये संपूर्ण रहाणे कुटुंब आनंदी दिसत आहे. (Photo- Radhika Dhopavkar)

67

अजिंक्य रहाणे सध्या भारतीय टीममध्ये नाही, पण रणजी ट्रॉफीमध्ये तो मुंबईचा कर्णधार आहे. अजिंक्यने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात द्विशतकी खेळी केली. (Photo- Radhika Dhopavkar)

77

आयपीएल 2023 चा लिलाव उद्या म्हणजेच शुक्रवारी होत आहे. या लिलावात अजिंक्य रहाणेवर कोण बोली लावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मागच्या मोसमात अजिंक्य रहाणे केकेआरसोबत होता, पण या मोसमाआधी केकेआरने त्याला रिलीज केलं. (Photo- Radhika Dhopavkar)

  • FIRST PUBLISHED :