NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / 5 हँडसम क्रिकेटर, ज्यांच्यावर फिदा होत्या बॉलिवूडच्या अभिनेत्री; चौघांनी तर त्यांच्याशीच केलं लग्न

5 हँडसम क्रिकेटर, ज्यांच्यावर फिदा होत्या बॉलिवूडच्या अभिनेत्री; चौघांनी तर त्यांच्याशीच केलं लग्न

भारतीय क्रिकेटर आणि बाॅलीवुडच नातं हे फार जुनं आहे. काही दिग्गज खेळाडूंनी तर या बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न देखील केलं. काही अभिनेत्रींनी तर लग्नासाठी आपला धर्म देखील बदलला. अशाच बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्सच्या लव्ह स्टोरी विषयी जाणून घेऊयात.

16

काही वर्षांपूर्वी टीम इंडियाचे माजी क्रिकेटर रवी शास्त्री आणि अमृता सिंग यांच्यात जवळीक वाढल्याच्या बातम्या येत होत्या. त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होत. परंतु या दोघांचे प्रेम लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही.

26

शर्मिला टागोर यांनीही क्रिकेटपटूशी लग्न केले. त्यांनी माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांना आपला जीवनसाथी बनवले. प्रदीर्घ अफेअरनंतर दोघांनी 1969 मध्ये लग्न केले. मन्सूर अली खानशी लग्न करण्यासाठी शर्मिला यांना धर्म बदलावा लागला होता.

36

अभिनेत्री हेजल कीच हिने देखील क्रिकेटर युवराज सिंग यांच्याशी लग्न केले. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2016 मध्ये लग्न केले होते.

46

भारताची माजी वेगवान गोलंदाज जहीर खानला याने 2017 मध्ये त्यांनी अभिनेत्री सागरिका घाटगे सोबत लग्न केले. दोघेही भिन्न धर्माचे आहेत, परंतु धर्म त्यांच्या प्रेमाच्या आड येऊ शकले नाही.

56

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले. एका जाहिरातीदरम्यान त्यांची भेट झाली. दोघांच्या लग्नानाची बरीच चर्चा रंगली होती. दोघांनीही इटलीत लग्न केले. या दोघांनाही वामिका नावाची मुलगी आहे.

66

याशिवाय हार्दिक पांड्या-नताशा स्टॅनकोविच, हरभजन सिंग-गीता बसरा आणि मोहम्मद अझरुद्दीन-संगीता बिजलानी यांनीही लग्न केले. मात्र, अझरुद्दीन आणि संगीता बिजलानी यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही.

  • FIRST PUBLISHED :