NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / श्रीरामावरून बाळाची ही छानशी नावे ठेवू शकता; यापैकी एक तुम्हाला नक्की आवडेल

श्रीरामावरून बाळाची ही छानशी नावे ठेवू शकता; यापैकी एक तुम्हाला नक्की आवडेल

धार्मिक श्रद्धा असलेले बहुतांशी लोक एखाद्या देवाच्या नावावरून आपल्या बाळाचं आधुनिक नाव ठेवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी श्रीराम, गणपती, विष्णू, हनुमान यांच्या विविध नावांना लोकांची पसंती असते. प्रभू श्रीरामांची काही नावे जाणून घेऊ, जी तशी आधुनिक आणि अद्वितीय आहेत. जर तुम्हीही तुमच्या मुलासाठी एखादं नवीन नाव शोधत असाल तर तुम्ही श्रीरामाच्या या नावांचा विचार करू शकता.

16

अविराज: अविराज हे भगवान रामाच्या अनेक नावांपैकी एक आहे. आजच्या आधुनिक दृष्टिकोनातून बघितलं तर ते एक अतिशय अनोखं नाव आहे. अविराज म्हणजे सूर्याप्रमाणे चमकणारा. जर तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव भगवान रामाच्या नावावर ठेवायचे असेल तर हा एक चांगला पर्याय असू शकतो.

26

मानविक: हे भगवान रामाचे एक नाव आहे. तुमचा मुलगा हुशार, दयाळू आणि देवावर विश्वास ठेवणारा बनवायचा असेल तर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव मानविक ठेवू शकता.

36

विराज: विराज हे प्रभू रामाच्या अनेक नावांपैकी एक आहे, भगवान राम हे सूर्यवंशी होते, म्हणून त्यांना सूर्याचा राजा देखील म्हटले जाते आणि या नावाचा अर्थही तोच आहे. आधुनिक युगाच्या अनुषंगाने पाहिले तर ते एक अतिशय वेगळे नाव आहे.

46

शाश्वत: सनातन धर्माचे दुसरे नाव शाश्वत आहे आणि हे राजारामाचेही नाव आहे. हे नाव जेवढे अद्वितीय आहे तेवढेच त्यात वेगळेपण आहे. म्हणून आपण आपल्या मुलाचे असे नाव ठेवू शकता.

56

अद्वैत: अद्वैत हे भगवान रामाचे नाव आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे हे नाव ठेवू शकता. या नावाचा अर्थ अविश्वसनीय आहे किंवा त्याच्यासारखा कोणीही नाही.

66

अथर्व: चार वेदांपैकी एक अथर्व आहे आणि ते भगवान रामाचे नाव देखील आहे. या नावाचा अर्थ वेदांचा जाणता, असे आहे.

  • FIRST PUBLISHED :