अशी अनेक नावे हिंदू धर्मग्रंथांमध्ये दिली आहेत, जी प्रसिद्ध इंग्रजी नावांनाही मागे टाकतात. आधुनिक नावंही त्यांच्यासमोर अर्थहीन वाटतात. अशी काही नावं हनुमान चालिसेत दिली आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण खरंच असं आहे.
शुभ - हनुमान चालिसाचे पठण करणे अत्यंत शुभ मानलं जातं. असे मानले जाते की, हनुमान चालिसेचे नियमित पठण केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात. हनुमान चालिसामध्ये अशी अनेक नावे दिली आहेत, जी तुम्ही तुमच्या मुलालाही देऊ शकता.
कोणती नावे सांगितलेत - हनुमान चालिसेमध्ये नमूद केलेल्या नावांमध्ये सरोज, मनु आणि रघुवर यांचा समावेश आहे. याशिवाय बिमल, पवन आणि हनुमान यांचीही नावे यात सापडतील.
हनुमान चालिसेतही सागर नावाचा उल्लेख आहे. तुम्ही तुमच्या मुलाला रामाचेही हे देखील नाव देऊ शकता. त्याचबरोबर मुलींना अंजनी हे नावही ठेवता येईल.
हनुमान चालिसेतील इतर नावे - याशिवाय बाळाचे नाव विक्रम, शंकर आणि केसरी असेही ठेवू शकता. हनुमान चालिसामध्येही तेज नावाचा उल्लेख आहे. त्याचबरोबर लखन हे नावही ठेवता येईल. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)