NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / सोमवारी केलेली ही कामं लाभदायी ठरतात, महादेवाची कृपा संपूर्ण कुंटुंबावर राहते

सोमवारी केलेली ही कामं लाभदायी ठरतात, महादेवाची कृपा संपूर्ण कुंटुंबावर राहते

सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस मानला जातो. शंकराची रोज पूजा केली जात असली तरी सोमवारी पूजा केल्यानं भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले आहे. शास्त्रानुसार सोमवारी व्रत ठेवल्यानं घरात सुख-शांती नांदते. पुराणात महादेवाचे वर्णन अत्यंत भोळा-शंकर असे केले आहे. असे मानले जाते की, भक्तांच्या साध्या भक्तीनंही महादेव लगेच प्रसन्न होतात. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी सोमवारी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून एखाद्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मिळू शकेल, याविषयी माहिती दिली आहे.

15

1. पांढरे वस्त्र दान करा : सोमवारी दान केल्यानं भगवान शंकर खूप प्रसन्न होतात. असे मानले जाते की, या दिवशी दूध, साखर, पांढरे वस्त्र आणि दही गरजू व्यक्तीला दान करावे. या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात.

25

2. धतुरा आणि दूध अर्पण करा : सोमवारी महादेवाला दूध अर्पण करावे. दुधाचा अभिषेक केल्यानं महादेव खूप प्रसन्न होतात. महादेवाला धतुरा खूप आवडतो, असे मानले जाते. म्हणूनच त्यांना नक्कीच धतुरा अर्पण करा.

35

3. बेलपत्र अर्पण करा: बेलपत्र भगवान शंकराला खूप प्रिय आहे. बेलपत्र, आक, गंगेचे पाणी, चंदन आणि अक्षत सोमवारी भोलेनाथाला अर्पण करावे. महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील.

45

4. तूप-साखर आणि पीठ अर्पण करा: हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, दर सोमवारी भगवान शंकराला तूप, साखर आणि गव्हाचे पीठ अर्पण करा. यानंतर त्यांची आरती करावी. या उपायाने तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी राहील. यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद मिळेल.

55

5. शिव-रक्षा स्रोत पाठ करा: जर तुम्ही खूप मेहनत करत असाल आणि तरीही फळ मिळत नसेल तर सोमवारी शिव मंदिरात जा आणि शिवरक्षा स्त्रोत्र पाठ करा. या उपायाने तुम्हाला फायदा होईल. यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनू शकाल. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :