NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / महिलाही हनुमानाचे मंदिरात दर्शन घेऊ शकतात; फक्त या 3 गोष्टींची खबरदारी घ्या

महिलाही हनुमानाचे मंदिरात दर्शन घेऊ शकतात; फक्त या 3 गोष्टींची खबरदारी घ्या

हिंदू धर्माला मानणारे बहुतेक लोक हनुमानाची पूजा करतात. असे मानले जाते की, बजरंगबलीच्या कृपेने जीवनातील अनेक संकटे दूर होतात. हनुमानाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी काही ठिकाणी शनिवारी तर काही ठिकाणी मंगळवारी पूजा केली जाते.

15

संकटमोचन हनुमान भक्तांची संकटे दूर करतात. अनेकदा तुम्ही ऐकले असेल की हनुमानाची पूजा फक्त पुरुषांनीच करावी, पण काही खास गोष्टी लक्षात ठेवून महिलाही रामभक्त हनुमानाची पूजा करून त्यांचे आशीर्वाद मिळवू शकतात. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.

25

मूर्तीला हात लावू नका - प्रचलित मान्यतेनुसार, महिलांनी हनुमानाच्या मूर्तीला स्पर्श करणे टाळावे. कारण हनुमान हा ब्रह्मचारी आहे, असे धार्मिक ग्रंथात वर्णन आहे. या कारणास्तव महिला हनुमानाची पूजा करू शकत नाहीत हे मान्य केले गेले आहे. स्त्रिया हनुमानाच्या मूर्तीला हात न लावता दुरूनच त्यांची पूजा करू शकतात.

35

डोके झुकवू नये - धार्मिक मान्यतेनुसार, पवनपुत्र हनुमानासमोर कोणत्याही स्त्रीने डोके टेकवू नये. याचे कारण असे सांगितले जाते की, बजरंगबली स्वतः देवी सीतेला आपली माता मानून नतमस्तक झाले होते आणि ते सर्व वयोगटातील स्त्रियांना माता मानतात.

45

कोणत्याही स्त्रीने आपल्यापुढे नतमस्तक व्हावे, असे हनुमानाला वाटत नाही. महिलांनी बजरंगबलीची पूजा करताना त्याच्यासमोर डोके न ठेकवता, हात जोडून नमस्कार करावा, काही चूक झाल्यास क्षमा मागावी.

55

जल अर्पण करू नये - धार्मिक मान्यतेनुसार, देवतांच्या मूर्तींना जल अर्पण करणे हे विधी म्हणून गणले जाते. प्रथम जल अर्पण करून पूजा सुरू केली जाते. एकप्रकारे, याला स्नान म्हणून पाहिले जाते, म्हणून महिलांनी ब्रह्मचारी हनुमानाला पाणी किंवा वस्त्र अर्पण करू नये. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :