NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / हनुमानाला का म्हटलं जातं 'अष्टसिद्धी के दाता'; कोणत्या आहेत त्या आठ सिद्धी?

हनुमानाला का म्हटलं जातं 'अष्टसिद्धी के दाता'; कोणत्या आहेत त्या आठ सिद्धी?

हिंदू धर्मात प्राचीन काळापासून सिद्धी आणि दैवी ज्ञानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. सिद्धी या शब्दाचा अर्थ सिद्धी प्राप्त करणे असा आहे. हिंदू धर्मग्रंथांनुसार, बजरंगबली हे महादेवाचे 11 वे अवतार, अष्ट सिद्धी आणि नवनिधी दाता म्हणून ओळखले जातात. गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेल्या हनुमान चालिसाच्या एका ओळीत असे म्हटले आहे. "अष्ट सिद्धी नवनिधी के दाता, असबर दीन जानकी माता". या दोह्यात ज्या सिद्धींबद्दल सांगितले आहे, त्या अतिशय चमत्कारिक शक्ती आहेत आणि या आठही सिद्धी हनुमानाला वरदान म्हणून प्राप्त झाल्या आहेत. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.

18

अनिमा- अनिमा सिद्धीच्या आधारे हनुमान कधीही अतिशय सूक्ष्म रूप धारण करू शकतात. ही सिद्धी हनुमानाने महासागर पार करून लंकेत पोहोचल्यानंतर वापरली होती. या सिद्धीचा वापर करून हनुमानाने संपूर्ण लंकेचे निरीक्षण केले आणि अतिशय सूक्ष्म रुप असल्यामुळे लंकेतील लोकांना हनुमानाबद्दल अजिबात माहिती नव्हती.

28

महिमा- महिमा सिद्धीच्या मदतीने हनुमान आपले शरीर विशाल करू शकले. ही पद्धत हनुमानाने लंका ओलांडताना वाटेत सापांची माता सुरसा हिला पराभूत करण्यासाठी वापरली होती. याशिवाय माता सीतेला श्री रामाच्या वानरसेनेवर विश्वास बसावा, म्हणून हनुमाने या सिद्धीचा उपयोग करून आपले रूप फार भव्य केले होते.

38

गरिमा- या सिद्धीच्या साहाय्याने हनुमान स्वतःचे वजन मोठ्या पर्वतासारखे वजनदार करू शकत होते. ही सिद्धी महाभारत काळात हनुमानाने भीमासमोर वापरली होती. जेव्हा भीमाला आपल्या सामर्थ्याचा गर्व झाला. तेव्हा हनुमानाने म्हातार्‍या माकडाचे रूप धारण केले आणि भीमाचा गर्व मोडण्यासाठी वाटेत शेपूट पसरवली. भीमाने हनुमानाची शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला पण ती शेपूट त्याला उचलता आली नाही, त्यामुळे भीमचा गर्व/अभिमान चकनाचूर झाला.

48

लघिमा - या सिद्धीमुळे हनुमान स्वतःचा भार पूर्णपणे हलका करू शकत होते आणि ते एका क्षणात कुठेही जाऊ शकतात. हनुमान अशोक वाटिकेत होते, तेव्हा त्यांनी अनिमा आणि लघिमा सिद्धी वापरून सूक्ष्म रूप धारण केले आणि अशोक वाटिकेच्या झाडांच्या पानात लपले. या पानांत बसून त्यांनी माता सीतेला ओळख करून दिली.

58

प्राप्ती - या सिद्धीद्वारे हनुमानाला लगेच काहीही मिळू शकते. प्राणी पक्ष्यांची भाषा समजू शकत होते आणि भविष्य देखील पाहू शकतात. रामायणात हनुमानाने माता सीतेचा शोध घेताना अनेक प्राणी आणि पक्ष्यांशी संवाद साधताना या सिद्धीचा वापर केला होता.

68

प्राकाम्य- या सिद्धीच्या मदतीने हनुमानजी कुठेही जाऊ शकतात. आकाशात ऊंच झेप घेऊ शकत होते आणि हवे तितके दिवस पाण्यात जिवंत राहू शकत होते. या सिद्धीमुळे हनुमान कायम तरुण राहू शकतात. या सिद्धीद्वारेच हनुमान आपल्या इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करू शकतो. रामचरितमानसमध्ये, हनुमान सुग्रीवांच्या सांगण्यावरून ब्राह्मणाच्या रूपात प्रभू रामाला भेटले.

78

ईशित्व- या सिद्धीद्वारे हनुमानाला अनेक दैवी शक्ती प्राप्त झाल्या. या सिद्धीच्या प्रभावाने हनुमानाने संपूर्ण वानरसेनेचे कुशलतेने नेतृत्व केले होते. या शक्तींमुळे त्यांनी माकडांवर नियंत्रण ठेवले. यासह त्यांनी या ईशित्वाने युद्धातील मृत माकडांना जिवंत केले.

88

वशित्व- या सिद्धीमुळे हनुमान जितेंद्रिय आहेत आणि आपल्या मनावर-भावनेवर नियंत्रण ठेवू शकतात. वशित्व सिद्धीमुळे हनुमान कोणत्याही जीव-प्राण्याला वश करून ठेवू शकतात. या प्रभावांमुळेच हनुमान अतुलित बलधाम आहे. अशा या अष्टसिद्धी असलेला हनुमान या सिद्धींचा दाता होईल ("अष्ट सिद्धी नवनिधी के दाता, असबर दीन जानकी माता"), असे आशीर्वाद त्याला जानकी मातेने दिले होते. म्हणजे हनुमान आपल्या भक्तांना या सिद्धींचे वरदान देऊ शकतात.

  • FIRST PUBLISHED :