NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / हनुमानाच्या गदेचे नाव काय? ती हनुमानाला कोणी दिली होती? कोणत्या धातूची आहे?

हनुमानाच्या गदेचे नाव काय? ती हनुमानाला कोणी दिली होती? कोणत्या धातूची आहे?

हनुमान आणि गदा हे समीकरण ठरलेलं आहे, हनुमानाची एकही मूर्ती आपण गदेशिवाय पाहिली नसेल. यावर तुम्ही कधी विचार केला आहे का की, ही गदा हनुमानाला कोणी दिली असेल? हनुमानाच्या गदेचे नाव काय? आणि ती कोणत्या धातूपासून बनवलेली आहे. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.

15

हनुमानाला गदा कशी मिळाली? धार्मिक ग्रंथानुसार, एकदा बाल हनुमान सूर्याला फळ समजून खायला निघाला होता. त्यावेळी इंद्राच्या वज्रप्रहारामुळे हनुमान मूर्च्छित झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या वायुदेवाने आपली हालचाल थांबवली आणि संपूर्ण त्रैलोक्य दुःखी झाला. त्यानंतर ब्रह्मदेवाने हनुमानाला जिवंत केलं आणि सर्व देवतांनी हनुमानाला काही ना काही वरदान दिले. देवतांनी त्यांच्या दैवी शस्त्रांपासून निर्भय राहण्याचे वरदानही दिले होते. त्यावेळी भगवान कुबेरांनी बाल हनुमानाला गदा दिली होती, असे मानले जाते.

25

हनुमानाच्या गदेचे नाव काय? धार्मिक ग्रंथानुसार रामभक्त हनुमानाच्या गदाचे नाव कौमोदकी गदा असे आहे. ही गदा त्यांना कुबेर देव यांच्याकडून मिळाली होती. अगस्त्य ऋषी सांगतात की, हनुमानजींच्या पंचमुखी अवतारात खडग, खटवांग, पर्वत, अंकुश, त्रिशूल, पाश, मुठी, स्तंभ, गदा आणि वृक्ष आहेत. पण बजरंगबलीमध्ये अफाट सामर्थ्य होते त्यामुळे त्यांनी कधीही लोखंडी सळी, पर्वत आणि झाड याशिवाय दुसरे कोणतेही शस्त्र वापरले नाही.

35

ही गदा कोणत्या धातूची होती? पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगतात की हनुमानाला कुबेर देव यांनी सोन्याची गदा भेट दिली होती. जी आकाराने खूप मोठी आणि खूप जड होती. हनुमानाला आपल्या गदेने अनेक राक्षसांना मारले असाही उल्लेख आहे.

45

हनुमान कोणत्या हातात गदा ठेवतात? तुम्ही हनुमानाच्या मूर्तीत किंवा चित्रात डाव्या हातात गदा धरलेले पाहिले असेल. डाव्या हातात गदा धरल्यामुळे त्याला वामहस्तगदायुक्तम् असेही म्हणतात. धार्मिक ग्रंथांनुसार कुबेरांनी हनुमानाला जेव्हा गदा दिली होती, त्यावेळी त्यांनी वरदान दिले होते की, ही गदा हातात घेऊन तुम्ही कधीही युद्धात पराभूत होऊ शकत नाही. हनुमानाला भूत आणि आत्मेदेखील घाबरतात.

55

बजरंगबली अत्यंत शक्तिशाली आहे. पंडित हितेंद्र कुमार शर्मा स्पष्ट करतात की, वाल्मिकी रामायणात कोणत्या प्रकारची गदा असल्याचं वर्णन नाही. बजरंगबलीच्या मुठी, हात आणि शेपटीत अफाट शक्ती होती. त्याची शक्ती अमर्याद आणि अविश्वसनीय आहे, म्हणून हनुमानाला कधीही विशेष गदेची गरज भासली नाही.

  • FIRST PUBLISHED :