फक्त गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन वर्जित आहे. या दिवशी चंद्रदर्शन केले तर चोरीचा आळ येतो, असे म्हणतात.
एकदा श्री गणेश मार्गस्थ असताना उंदरावरून घसरून खाली पडले. ते बघून चंद्र मोठ्याने हसला. गणेशाला राग अनावर होऊन त्यांनी चंद्राला शाप दिला की, आजपासून जो कोणी तुझे दर्शन करेल त्यावर चोरीचा आळ येईल.
चंद्राने अतिशय लज्जित होऊन गणेशाची क्षमा मागितली व तपस्या करून त्यांना प्रसन्न करून घेतले.
त्यावर गणेश प्रसन्न झाले व त्यांनी त्याला वरदान दिले. मात्र, गणेश बोलले की जो कोणी गणेश चतुर्थीला तुझे दर्शन घेईल त्यावर चोरीचा आळ येईल.
तेव्हापासून गणेश चतुर्थीला चंद्र दर्शन वर्जित आहे. श्रीकृष्णाने चंद्र दर्शन केले आणि त्यावर स्यमंतक मण्याच्या चोरीचा आळ आला.
चुकून चंद्रदर्शन झाल्यास त्याचे निवारण होण्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे, अशी आख्यायिका आहे. गणेश चतुर्थी ही विनायक चतुर्थी मानली जाते. म्हणून फक्त गणेश चतुर्थी दिवशी चंद्र दर्शन वर्ज्य आहे, अशी माहिती ज्योतिषतज्ज्ञ ऋतुपर्णा मुजुमदार यांनी दिली.