NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Vastu: वैवाहिक आयुष्य होईल पुन्हा नव्यासारखे, या अचूक वास्तू टिप्स कामी येतील

Vastu: वैवाहिक आयुष्य होईल पुन्हा नव्यासारखे, या अचूक वास्तू टिप्स कामी येतील

Vastu Tips In Marathi: पती-पत्नीच्या नात्याला दोघांच्याही जीवनात विशेष महत्त्व आहे. कोणत्याही नात्याचा, सहजीवनाचा पाया हा प्रेम मानला जातो. परंतु, अनेकवेळा अथक प्रयत्नांनंतरही वैवाहिक जीवनात वितुष्ट येऊ लागते आणि पती-पत्नीमध्ये भांडणे वाढतात. या सर्व गोष्टींमुळे अनेक वेळा काही लोकांची मानसिक स्थितीही बिघडू लागते. त्यामुळे नात्यात अधिक दुरावा निर्माण होतो. अनेक वेळा वैवाहिक जीवनात या समस्या येण्याचे कारण घरातील वास्तुदोष देखील असतात.

16

वास्तुशास्त्राचे नियम लक्षात घेऊन घरातील सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवल्या तर वैवाहिक जीवनात गोडवा कायम राहतो. वैवाहिक जीवनात गोडवा आणण्यासाठी पती-पत्नीच्या बेडरूममध्ये ठेवलेल्या वस्तू वास्तुशास्त्रानुसार असणे आवश्यक आहे. ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.

26

1. बेडरूममध्ये आरसा नसावा बेडरूममध्ये आरसा लावल्याने सुखी वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात, असे वास्तुशास्त्राचे मत आहे. घराच्या बेडरूममध्ये आरसा लावल्याने घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. बेडरूममध्ये आरसा असेल तर त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये नेहमीच तेढ निर्माण होते. बेडरूममध्ये आरसा लावणे खूप गरजेचे असेल तर रात्री झोपताना त्यावर कापड/पडदा लावावा. रात्रीच्या वेळी पती-पत्नीचे प्रतिबिंब आरशात दिसल्यास आदर कमी होतो आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात, असे वास्तुशास्त्राचे मत आहे.

36

2. बेडरूममध्ये देवाचे चित्र नसावे बेडरुमच्या भिंतींवर देवदेवतांचे चित्र लावणे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात चांगले मानले जात नाही. अनेक लोक आपल्या बेडरूममध्ये देवाचे चित्र लावतात, परंतु ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने घरात कलह निर्माण होऊ शकतो. बेडरूममध्ये देवाचे चित्र लावायचे असेल तर राधा-कृष्णाचे चित्र लावू शकता.

46

3. आग्नेय कोनात कोणतीही जड वस्तू ठेवू नका वास्तुशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रानुसार घराच्या आग्नेय दिशेला आग्नेय कोन म्हणतात. वास्तुशास्त्र सांगते की घराच्या आग्नेय कोपर्‍यात कोणतीही जड वस्तू कधीही ठेवू नये. त्यामुळे घरात विनाकारण मारामारी, भांडणे वाढतात आणि पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होतो.

56

4. या दिशेला बेड ठेवा वास्तुशास्त्रानुसार, बेडरुममध्ये बेड ठेवण्याची योग्य दिशा खूप महत्त्वाची आहे. जर बेडरुममध्ये पलंग योग्य दिशेने ठेवला नाही तर लवकरच घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि पती-पत्नीच्या जीवनातून सुख-समृद्धी दूर होते. त्यामुळे घरातील लोकांमध्येही भांडणे वाढू लागतात. खोलीतील पलंगाची दिशा दक्षिण किंवा पश्चिम असावी असे वास्तुशास्त्र सांगते.

66

5. बेडजवळ खरकटी भांडी ठेवू नका बरेच लोक रात्री किंवा दिवसा अंथरुणावर बसून खाता-पितात आणि खरकटी भांडी तिथेच ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. बिछान्याभोवती खरकटी भांडी ठेवल्याने लक्ष्मी घरात वास करत नाही आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती ढासळू लागते, असे मानले जाते.

  • FIRST PUBLISHED :