NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Vastu: झाडुला लक्ष्मी का मानलं जातं? वास्तुशास्त्रानुसार घरातील झाडूविषयी या गोष्टी महत्त्वाच्या

Vastu: झाडुला लक्ष्मी का मानलं जातं? वास्तुशास्त्रानुसार घरातील झाडूविषयी या गोष्टी महत्त्वाच्या

Vastu Tips Marathi : स्वच्छतेसाठी वापरला जाणारा झाडू ही एक अशी वस्तू आहे, जी सर्वांच्याच घरात आढळते. घर स्वच्छ करण्यासाठी झाडूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. झाडूला लक्ष्मीचं रूपदेखील म्हटलं जातं. घर झाडल्यामुळे घरातली घाण बाहेर टाकली जाते आणि स्वच्छता, पावित्र्य आणि संपत्ती घरात येते. जेव्हा गरिबी दूर होते, तेव्हाच लक्ष्मी माता घरात प्रवेश करते. त्यामुळे झाडूला लक्ष्मी मातेचं रूप मानलं गेलं आहे. मात्र, अनेक जणांना हे माहीत नसतं आणि त्यामुळे ते झाडूचा योग्य पद्धतीने वापर करत नाहीत नाहीत. झाडूचा योग्य वापर कसा करावा आणि नवीन झाडू खरेदी करताना काय काळजी घ्यावी, याबद्दलची माहिती घेऊ या.

16

तुम्ही कधी झाडूची रचना किंवा बांधणी निरखून पहिली आहे का? सर्वप्रथम झाडूचा आकार पाहा. झाडू म्हणजे झाडाची पानं आणि काटे यांचं एकत्रित रूप आहे. जेव्हा ते पूर्ण एकतेने बांधले जातात, तेव्हा हा झाडू घाण साफ करण्यासाठी तयार होतो. झाडूची संपूर्ण यंत्रणा एकजुटीवर अवलंबून आहे. केवळ एका काडीने साफसफाई केली जाऊ शकत नाही.

26

वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे, घरात सुख-समृद्धी नांदण्यासाठी झाडूचा महत्त्वाचा वाटा असतो. ज्या घरात झाडू योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक वापरला जातो, त्या घरात सकारात्मकता दिसते. झाडू योग्य पद्धतीने वापरण्यासाठी काही खास गोष्टी जाणून घ्या.

36

झाडू खरेदीचे नियम... नवीन झाडू खरेदी करताना काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. नवीन झाडूची खरेदी करताना ती नेहमी शनिवारीच करावी. कारण शनिवारी घरात नवीन झाडू वापरणं खूप शुभ मानलं जातं. तुम्ही नवं घर घेतलं असेल आणि तुम्हाला त्या घरामध्ये राहायला जायचं असेल तर तुम्ही नवीन घरात नवीन झाडू झाडू घ्यावा.

46

नवीन घरात गेल्यावर नवीन झाडूचा वापर केल्यामुळे तुमच्या घरात समृद्धी आणि नवचैतन्य निर्माण होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीपावलीच्या सणाला धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर घराची साफसफाई करण्याचा झाडू आणि देवघराचा झाडू कायम वेगवेगळा ठेवावा.

56

वास्तुशास्त्रानुसार घरातल्या झाडूची योग्य जागा... वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पश्चिम म्हणजेच नैर्ऋत्य दिशेला झाडू ठेवणं सर्वांत योग्य असतं. हे शक्य नसेल तर झाडू अशा ठिकाणी ठेवावा, जिथे तो कोणाला दिसणार नाही. झाडू कधीही स्वयंपाकघर आणि धान्य साठवणुकीच्या खोलीत ठेवू नये. यामुळे घरात आजारपण आणि गरिबी येते. त्याचप्रमाणे घरात झाडू कधीही उभा ठेवू नये. तो नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, की झाडू कधीही जाळू नये.

66

झाडू वापराबद्दल काही खास गोष्टी... एखादी व्यक्ती नुकतीच घरातून बाहेर पडली असेल तर त्यानंतर लगेच घर झाडू नये. किमान अर्ध्या तासानंतरच घर झाडून स्वच्छ करावे. रात्रीच्या वेळी घर झाडल्यानंतर कचरा दुसऱ्या दिवशीच घराबाहेर टाकावा. घरात चालताना काही वेळा चुकून आपला पाय झाडूवर पडू शकतो; मात्र त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो. त्यामुळे असं घडल्यास लगेचच नमस्कार करून क्षमा मागावी. झाडूबद्दल आणखी एक रंजक गोष्टदेखील आहे. रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजाजवळ झाडू ठेवा आणि झोपा. यामुळे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही.

  • FIRST PUBLISHED :