टेबलावर ठेवा लकी क्रॅसुला - वास्तुशास्त्रानुसार ज्याप्रमाणे घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंददायी ठेवणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे कार्यालयासाठी सकारात्मक ऊर्जाही तितकीच महत्त्वाची मानली गेली आहे. यासाठी तुम्ही तुमच्या डेस्कवर क्रॅसुला प्लांट ठेवू शकता. हे रोप केवळ पैसा आकर्षित करत नाही तर प्रगतीसाठी देखील शुभ मानले जाते.
बांबू प्लांट- वास्तुशास्त्रानुसार ऑफिसच्या टेबलावर किंवा कामाच्या ठिकाणी बांबू रोप ठेवल्यास तुमचे नशीब उजळेल आणि तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळू शकते. बांबूचे रोप एखाद्याने दान केले असेल तर ते अधिक शुभ मानले जाते.
टेबलावर पुरेसा प्रकाश असावा- वास्तुशास्त्रानुसार तुमच्या टेबलावर पुरेसा प्रकाश असेल याची विशेष काळजी घ्या. कारण जर तुमचा टेबल अंधारात ठेवला असेल तर तुमच्या भागात नकारात्मक उर्जेचा संचार वाढू शकतो आणि ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
सोन्याच्या नाण्यांनी भरलेले जहाज- वास्तुशास्त्रानुसार, जर तुमचे प्रमोशन खूप दिवसांपासून रखडले असेल आणि तुम्हाला इन्क्रीमेंटसह प्रमोशन मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या टेबलावर सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या जहाजाची प्रतिकृती ठेवू शकता. यामुळे तुम्हाला प्रमोशन तर मिळेलच पण पगारही चांगला वाढेल.
सुकलेली फुले आणि झाडे ठेवू नका - वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या टेबलावर सुकलेली फुले किंवा झाडे असतील तर ती लगेच काढून टाका. ही सुकलेली फुले आणि झाडे तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात. जर तुम्हाला तुमच्या टेबलावर फुले ठेवायची असतील तर त्यांना पाण्यात ठेवा आणि ते कोमेजण्यापूर्वी बदला. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)