NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / दुबईतल्या हिंदू मंदिराची पहिली झलक पाहण्यासाठी गर्दी, तुम्हीही पाहा Photo

दुबईतल्या हिंदू मंदिराची पहिली झलक पाहण्यासाठी गर्दी, तुम्हीही पाहा Photo

Hindu Temple In Dubai: मंदिरात वैदिक श्लोकांचं उच्चारण करण्यासाठी 14 पंडितांचा समूह भारतातून दुबईला गेला आहे. हा जप सकाळी साडे सात पासून ते सकाळी 11.30 पर्यंत आणि दुपारी 3.30 पासून रात्री 8.30 पर्यंत होतो. मंदिरात येणाऱ्या भक्तांनाही मंत्रोच्चारात भाग घेण्याची परवानगी आहे.

16

दुबईमधल्या नव्या हिंदू मंदिराची झलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. या महिन्याच्या सुरूवातीला दुबईमध्ये नवीन हिंदू मंदिर दर्शनासाठी खुलं झालं, तेव्हापासून युएईमधले हजारो रहिवासी हे मंदिर पाहण्यासाठी येत आहेत. (फोटो- twitter.com/sameersharmaa)

26

मंदिरामध्ये पहिल्या दिवसापासूनच खास करून आठवड्याच्या शेवटी मोठ्या संख्येने भक्त आले होते. गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार हे मंदिर 5 ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्यापासून औपचारिकरित्या सर्वसामन्यांसाठी खुलं होणार आहे. या मंदिरात सर्व धर्माच्या नागरिकांना प्रवेश मिळणार आहे. (फोटो- twitter.com/sameersharmaa)

36

दुबईच्या या मंदिरात जवळपास 16 हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिर प्रशासनाने त्यांच्या वेबसाईटवर क्यूआर-कोडच्या माध्यमातून बुकिंगला 1 सप्टेंबरपासून सुरूवात केली आणि मंदिराचं अनौपचारिक (सॉफ्ट) उद्घाटन केलं. (फोटो- twitter.com/sameersharmaa)

46

दुबईच्या मंदिरात श्रीराम, सीता, लक्ष्मण यांची सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीला लाल रंगाच्या फुलांचा हार घालण्यात आला आहे. मूर्तीच्या एका बाजूला हनुमान श्रीराम-लक्ष्मण आणि सीता यांना प्रणाम करताना दिसत आहेत. (फोटो- twitter.com/sameersharmaa)

56

याशिवाय मंदिरातून समोर आलेल्या फोटोंमध्ये भगवान शंकर यांचं वाहन द्वारपाल नंदीची मूर्तीही दिसत आहे. अनेक श्रद्धाळू आपली इच्छा नंदीच्या कानात सांगत आहेत. (फोटो- twitter.com/sameersharmaa)

66

दुबईचं हे मंदिर सकाळी साडेसहा वाजता उघडतं आणि रात्री साडेआठ पर्यंत दर्शनासाठी खुलं असतं. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंतची बहुतेक बुकिंग आधीच झाली आहेत. ऑक्टोबर महिन्यापर्यंतच बुकिंग करून मंदिरात प्रवेश दिला जाईल. ऑक्टोबरनंतर भक्तांना मंदिर उघडल्यानंतर कधीही दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. (फोटो- twitter.com/HSajwanization)

  • FIRST PUBLISHED :