NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Money Mantra: उधार देणं या राशींना आज महागात पडेल; कसं असेल आर्थिक राशीभविष्य

Money Mantra: उधार देणं या राशींना आज महागात पडेल; कसं असेल आर्थिक राशीभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (30 जून 2023) राशिभविष्य

112

मेष (Aries) : आज तुम्हाला जास्त प्रसिद्धी मिळेल. नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना नव्या संधी चालून येतील. संध्याकाळचा वेळ मित्रमंडळींसोबत जाईल. कामाच्या ठिकाणी केलेले सर्जनशील बदल आज तुम्हाला प्रेरित करतील. उपाय : गणपतीला लाडूचा नैवेद्य दाखवावा.

212

वृषभ (Taurus) : तुमच्या क्षेत्रातल्या एखाद्या नव्या नियोजनावर आज तुमचं सगळं लक्ष लागलेलं असेल. त्यामुळे तुमचा सगळा दिवस त्यातच गुंतलेला असेल. कुटुंबातल्या व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही पैसे खर्च कराल. व्यवसायामध्ये मित्राचा सल्ला फायदेशीर ठरेल. उपाय : सरस्वती मातेची उपासना करा.

312

मिथुन (Gemini) : कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रातही आज तुम्हाला वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारीही तुमच्या सल्ल्याने काम करतील, त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर सावधगिरीने घ्या. कारण आज तुमची निर्णयक्षमता खूपच मजबूत असेल. जे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, तेच काम आज तुम्ही करा. एखाद्याला पैसे उधार दिले असतील, तर आज ते परत मिळू शकतात. उपाय : पिवळ्या वस्तू दान करा.

412

कर्क (Cancer) : ऑफिसमधलं वातावरण आज तुमच्या मनासारखं असेल. आज मोकळ्या वेळात तुम्ही घरातली राहिलेली कामं पूर्ण करू शकाल आणि थोडी खरेदीही करू शकाल; पण तुमचं उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ साधणं गरजेचं आहे. नाही तर येत्या काळात तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. उपाय : वडिलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घ्या.

512

सिंह (Leo) : कामाच्या ठिकाणी तुमचे शत्रू तुमच्यासमोर हितचिंतक असल्यासारखं दाखवतील आणि तुमच्या पाठीमागे अडचणी निर्माण करतील. नवीन मालमत्ता विकत घेण्याचा विचार करत असलात, तर आजचा दिवस शुभ आहे. उपाय : लक्ष्मीची प्रार्थना करा.

612

कन्या (Virgo) : उद्योग-व्यवसायात नफ्याची शक्यता असेल, तेव्हाच काही अडचणी येतील. त्यामुळे कोणालाही उधारी देणं टाळा. संध्याकाळी मित्रमंडळींच्या मदतीने आर्थिक बाजू सशक्त होईल. उपाय : माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घाला.

712

तूळ (Libra) : तुमच्या कार्यक्षेत्रात एखादा वाद सुरू असेल, तर तो आज मिटेल. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही एखाद्या नव्या प्रकल्पावर काम कराल. त्याचा भविष्यात तुम्हाला भरपूर फायदा होईल. रिअल इस्टेट प्रकरणात काही महत्त्वाची कागदपत्रं गहाळ झाल्यामुळे आज काही समस्या येऊ शकतात. त्यामुळे काळजी घ्या. व्यवसायात काही चढ-उतार येऊ शकतात. तरीही तुमच्या स्पर्धकांच्या तुलनेत तुम्हाला नफ्याच्या जास्त संधी मिळतील. उपाय : हनुमानाला शेंदूर लावा.

812

वृश्चिक (Scorpio) : नोकरी आणि व्यवसायात काही नावीन्य आणू शकलात, तर भविष्यात त्याचे फायदे मिळतील आणि नवं आयुष्य जगू शकाल. आज एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतात; मात्र अनावश्यक वादात पडू नका. उपाय : विष्णुसहस्रनाम म्हणा.

912

धनू (Sagittarius) : तुमचे शत्रू तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी आज पूर्ण प्रयत्न करणार असल्यानं कार्यक्षेत्रात काम करताना सावध राहा आणि काळजी घ्या. बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असलात, तर आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज पैसे मिळवण्यासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठीही आज वेळ मिळेल. उद्योग-व्यवसायात एखादी जोखीम पत्करायचा विचार करत असलात, तर आधी वडिलांचा सल्ला घ्या. उपाय : गरजू व्यक्तींना मदत करा.

1012

मकर (Capricorn) : भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय करत असलात, तर त्यातून खूप नफा मिळेल. सरकारी नोकरी किंवा त्यासंबंधी काम करणाऱ्यांना आज प्रामाणिकपणे काम करावं लागेल. तसंच नियमांप्रमाणे वागावं लागेल. उपाय : गणपतीला लाडूचा नैवेद्य दाखवा.

1112

कुंभ (Aquarius) : आज तुमच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही कामात घाई करू नका. अन्यथा एखादी चूक होऊ शकते. विचार करून मगच कृती करा. उपाय : भगवान शंकरांचा नामजप करा.

1212

मीन (Pisces) : उद्योग-व्यवसायात एखादी जोखीम पत्करण्याचा विचार करत असलात, तर आजचा दिवस त्यासाठी चांगला आहे. या कामात भावंडांचादेखील पाठिंबा मिळेल. आज खर्च जास्त व उत्पन्न कमी राहील. तरीही तुमची आर्थिक परिस्थिती सामान्य असेल. उपाय : शनिचालिसा म्हणा. पिंपळाच्या झाडाला पाणी घाला.

  • FIRST PUBLISHED :