NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Money Mantra: पार्टनरशिपमध्ये बिझनेस करणाऱ्यांना आज भरपूर नफा मिळेल, आर्थिक राशीभविष्य

Money Mantra: पार्टनरशिपमध्ये बिझनेस करणाऱ्यांना आज भरपूर नफा मिळेल, आर्थिक राशीभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (11 जून 2023) राशिभविष्य

112

मेष (Aries) : नोकरदार व्यक्तींची काही नव्या माणसांशी ओळख होईल. त्या ओळखी भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील. व्यावसायिकांना आज काही प्रवास करावा लागेल. बिझनेस बहरात असल्याने आज मनात आनंदाची भावना असेल. उपाय : श्री विष्णूचं पूजन करा आणि पिवळ्या रंगाचा वापर करा.

212

वृषभ (Taurus) : कामाच्या ठिकाणी तुम्हाला समान अनुकूलता मिळणार नाही. तरीही छोट्या कामांमधल्या यशामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. उपाय : श्री विष्णूला बेसनाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवावा.

312

मिथुन (Gemini) : आज कौटुंबिक खर्चांमध्ये काटकसर करणं गरजेचं आहे. तसं केलं नाही, तर आर्थिक परिस्थिती बिघडेल. प्रॉपर्टी खरेदी करणार असलात, तर गरजेची कागदपत्रं पाहा. अन्यथा भविष्यात नुकसान होऊ शकतं. उपाय : केळ्याच्या झाडासह श्री विष्णूचं पूजन करा.

412

कर्क (Cancer) : आज वर्क बिझनेसमध्ये पैसे मिळवण्याच्या संधी मिळतील. सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी तुम्ही अधिक खर्च कराल. त्यामुळे तुम्ही बचत करू शकणार नाही आणि आर्थिक परिस्थिती बिघडू शकेल. आजचा दिवस नोकरदार व्यक्तींसाठी आरामदायी असेल. उपाय : 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र आंघोळ करताना म्हणावा.

512

सिंह (Leo) : आज नफा आणि तोटा यांचं प्रमाण सारखं असेल. त्यामुळे पैसे मिळण्यास कदाचित थोडा उशीर होईल. एखादा व्यवहार प्रलंबित असल्यास त्याला आज अंतिम रूप मिळू शकेल. त्यातून तुम्हाला खूप आनंद मिळेल. उपाय : मुंग्यांसाठी पीठ ठेवा. केळ्याच्या झाडाची पूजा करा.

612

कन्या (Virgo) : आज नोकरदार व्यक्तींचा कामाचा ताण वाढू शकतो; मात्र कष्ट केल्यास सगळं काम सायंकाळपर्यंत पूर्ण होईल. उपाय : चणाडाळ, गूळ आणि हळद घालून कणीक मळावी आणि ती गायीला खाऊ घालावी.

712

तूळ (Libra) : आज व्यावसायिक व्यक्ती दैनंदिन कामांसह नव्या कामातही नशीब आजमावतील. त्यातही ते यश मिळवतील. कामाच्या ठिकाणी कोणताही निर्णय घ्यायचा असेल, तर तो घाईगडबडीत घेऊ नका. अन्यथा तोटा होऊ शकतो. उपाय : चणाडाळ आणि गूळ हे घटक एकत्र करून पिवळ्या कापडात बांधावेत आणि भगवान विष्णूला अर्पण करावेत.

812

वृश्चिक (Scorpio) : आज कामाच्या ठिकाणी प्रगतीची नवी दारं उघडली जातील. त्यामुळे तुम्ही काही नवे मित्रही कराल. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांची वेळ मिळवण्यात यशस्वी व्हाल. उपाय : केळीच्या झाडाचं मूळ पिवळ्या कापडात बांधून ते गळ्याभोवती परिधान करा.

912

धनू (Sagittarius) : आज नोकरदार व्यक्तींना अस्वस्थ करण्याचे सर्व प्रयत्न त्यांचे शत्रू करतील. त्यामुळे दक्ष राहा आणि कामावर लक्ष केंद्रित करा. अधिकाऱ्यांशी बोलताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा भविष्यात तोटा होऊ शकतो. उपाय : केळीच्या झाडाचं पूजन करा. पिवळे कपडे दान करा. गरिबांना अन्नदान करा.

1012

मकर (Capricorn) : बिझनेसमध्ये कोणाचा तरी सल्ला घेण्याची गरज भासेल. सल्ला घेऊ इच्छित असलात, तर फक्त अनुभवी व्यक्तीकडूनच घ्या. घरात काही प्रॉपर्टीविषयक प्रकरण चालू असेल, तर आज ते तुमच्या बाजूने होईल. बिझनेसमध्ये मैत्रिणीच्या मदतीने आर्थिक लाभ होऊ शकतो. उपाय : मनगट आणि मानेवर Turmeric Vaccine लावा.

1112

कुंभ (Aquarius) : कामाच्या बाजूने मिळालेल्या बातमीमुळे आनंदी असाल. मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ झाल्याने निधीत वाढ होईल. उपाय : देवघरात Turmeric Garland (हळदीचा हार) टांगून ठेवा.

1212

मीन (Pisces) : आज व्यावसायिकांनी डीलला अंतिम रूप दिलं, तर भविष्यात पूर्ण लाभ होईल. पार्टनरशिपमध्ये बिझनेस करणाऱ्यांना आज खूप नफा मिळेल. उपाय : चणाडाळ आणि गूळ हे घटक एकत्र करून पिवळ्या कापडात बांधावेत आणि भगवान विष्णूला अर्पण करावेत.

  • FIRST PUBLISHED :