मकर आणि मेष रास मकर राशीच्या व्यक्तींचं राहणीमान आणि विचार चांगले असतात. मेष राशीच्या व्यक्ती खूप अधीर स्वभावाच्या असतात. त्यामुळे या दोन राशींच्या व्यक्तींचं एकमेकांशी अजिबात पटत नाही. मेष राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यावर नियंत्रण ठेवायला खूप आवडतं. मकर राशीच्या व्यक्तींना या गोष्टीचा खूप त्रास आणि तणाव जाणवतो.
वृश्चिक आणि कुंभ रास वृश्चिक आणि कुंभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव पूर्णपणे एकमेकांच्या विरुद्ध असतो. त्यांच्या नात्यात प्रेम आणि प्रामाणिकपणाचा अभाव असतो. एकमेकांसोबत पुढे जाण्यास आणि कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्यावर ते सहमत नसतात. यावरून त्यांच्यात वादविवाद होतात.
कन्या आणि धनू रास कन्या राशीच्या व्यक्ती कोणतंही काम परफेक्ट करतात आणि दुसऱ्याने तशाच पद्धतीने काम करावं अशी त्यांची अपेक्षा असते. त्यांच्या या सवयीमुळे मुक्त विचारांच्या धनू राशीच्या व्यक्तींना कन्या राशीची व्यक्ती आपल्या जीवनात हस्तक्षेप करतेय असं वाटू लागतं. कन्या राशीच्या व्यक्तीमुळे त्यांना एक प्रकारचा दबाव जाणवतो आणि या दोघांचं नातं सुरळीत राहत नाही.
तूळ आणि मकर रास तूळ राशीच्या व्यक्ती मोकळ्या मनाच्या असतात. मकर राशीच्या व्यक्ती चांगल्या वर्तणुकीसाठी ओळखल्या जातात. मकर राशीच्या व्यक्ती कधी कधी खूप कठोर वागतात. त्यामुळे तूळ राशीच्या व्यक्तींना त्यांच्यासोबत राहणं कठीण जातं. परिणामी या दोन राशीच्या व्यक्ती एकमेकांसोबत फार काळ राहू शकत नाहीत.
कर्क आणि तूळ रास प्रामाणिकपणा, स्थिरता, उदार आणि संवेदनशील स्वभाव हे कर्क राशीचे विशेष गुणधर्म आहेत. दुसरीकडे तूळ राशीच्या व्यक्ती फारशा निर्णयक्षम नसतात. तसंच त्या दिखाऊ स्वभावाच्या असतात. त्यामुळे या दोन राशीच्या व्यक्तींचं एकमेकांसोबत फारसं पटत नाही. कर्क राशीच्या व्यक्तींना तूळ राशीच्या व्यक्तींसोबत खूप संयमाने काम करावं लागतं. हा संयम सुटला तर संबंध बिघडू शकतात.