NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Religious tourism: उत्तराखंडला गेल्यास या मंदिरांना भेट देवू शकता; पौराणिक, धार्मिक महत्त्व असलेली ठिकाणे

Religious tourism: उत्तराखंडला गेल्यास या मंदिरांना भेट देवू शकता; पौराणिक, धार्मिक महत्त्व असलेली ठिकाणे

Religious tourism in India : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पौराणिक, धार्मिक महत्त्व असलेली विविध मंदिरे आहेत. या मंदिरांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. काही मंदिरांमध्ये नवस बोलण्याची परंपरा आहे. उत्तराखंडमध्ये धार्मिक पर्यटनासाठीही हा जिल्हा महत्त्वाचा ठरतो. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात कधी जाण्याचा योग आल्यास खाली माहिती दिलेल्या मंदिरांना अवश्य भेट द्या.

15

गोपीनाथ मंदिर: गोपीनाथ मंदिर चमोली जिल्ह्यातील गोपेश्वर येथे स्थित आहे, जे भगवान शिवाला समर्पित आहे. लोक हे मंदिर गोपीनाथ म्हणजेच भगवान कृष्णाशी संबंधित असल्याचे मानतात. उत्तराखंडमधील हे सर्वात उंच आणि सर्वात मोठे मंदिर असल्याचे ज्येष्ठ पत्रकार क्रांती भट्ट यांनी सांगितले.

25

रुद्रनाथ मंदिर: रुद्रनाथ मंदिर चमोली जिल्ह्यात घनदाट जंगल आणि शिखरांच्या मधोमध वसलेले आहे. या मंदिरात शिवाच्या मुखाची पूजा केली जाते. तर नेपाळच्या पशुपतीनाथमध्ये भगवान शंकराच्या चेहऱ्यासह संपूर्ण शरीराचीही पूजा केली जाते. यामुळे भक्त भगवान रुद्रनाथ मंदिराला पशुपतिनाथ मंदिर मानतात.

35

नृसिंह मंदिर: भगवान नृसिंहाचे मंदिर चमोली जिल्ह्यातील जोशीमठ येथील गंधमादन पर्वतावर आहे. भगवान विष्णू हे क्रोधाचे देवता मानले जातात, त्यामुळे त्यांची उग्र रूपात पूजा केली जाते, परंतु जोशीमठमध्ये जगातील एकमेव नरसिंह मंदिर असल्याचे सांगितले जाते, जिथे भगवान नरसिंहांची शांत स्वरूपात पूजा केली जाते.

45

उमा देवी मंदिर: चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयाग येथे अलकनंदा आणि पिंडर नदीच्या संगमाजवळ उमा देवीचे मंदिर आहे. ज्याला स्थानिक लोक "उमा शंकरी" या नावाने ओळखतात. उमा देवी मंदिरात कात्यायनी देवीच्या रूपात देवी उमाची पूजा केली जाते. हे मंदिर बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग-7 जवळ आहे.

55

अनसूया मंदिर: माता अनसूया मंदिर चमोलीच्या मंडल खोऱ्यातील घनदाट जंगलात वसलेले आहे. अपत्यहीन जोडप्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देशभरात ओळखले जाते. डिसेंबर महिन्यात माता अनुसयाच्या दरबारात जत्रा भरते. या दरम्यान निपुत्रिक जोडपी मुलांसाठी प्रार्थना करतात.

  • FIRST PUBLISHED :